महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Eating Disorders Doubled In Teens : कोरोना काळात मुलांमध्ये खाण्याचे विकार वाढले दुपटीने

यूमास येथील चॅन मेडिकल कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापक सिडनी हार्टमन म्युनिक यांनी कोरोना काळात मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याचे नमूद केले आहे. मुलांमध्ये खाण्याचे विकार वाढल्याचा दावाही त्यांनी आपल्या संशोधनात केला आहे.

Eating Disorders Doubled In Teens
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 1, 2023, 3:12 PM IST

वर्सेस्टर ( अमेरिका ) : कोरोनाच्या काळात मुलांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे वाढली आहेत. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाले आहे. आता तर कोरोना काळात मुलांमध्ये खाण्याचे विकार दुपटीने वाढल्याचा धक्कादायक प्रकार संशोधनातून उघड झाला आहे. मानसिक आरोग्यात खाण्याचे विकार सर्वात प्राणघातक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. त्यासह खाण्याचा विकार असलेल्या मुलांना सामान्य नागरिकांपेक्षा आत्महत्येचा धोका जास्त असल्याचा दावा यूमास चॅन मेडिकल स्कूलमधील बालरोगशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक सिडनी हार्टमन म्युनिक या संशोधकाने केला आहे.

खाण्याचा विकार असलेल्या मुलांमध्ये आत्महत्येचा धोका :कोरोना काळात मुलांच्या मानसिक आरोग्यावर खूप विपरित परिणाम झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या मुलांना कोरोना काळात खाण्याचे विकार बळावल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मात्र खाण्याचा विकार असलेल्या मुलांमध्ये इतर नागरिकांपेक्षा आत्महत्या करण्याचा धोका जास्त असल्याचेही या संशोधकांनी केला आहे. मात्र हा आजार मुलांमध्ये का होतो, याबाबतची कारणे शोधण्यात संशोधकांना यश आले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

खाण्याच्या विकारांची काय आहे व्याख्या : पौगंडावस्थेमध्ये सुरू होणाऱ्या खाण्याच्या विकारांमध्ये एनोरेक्सिया नर्वोसा, बुलिमिया नर्वोसा, इतर विशिष्‍ट खाणे, प्रतिबंधित अन्न सेवन विकार यांचा समावेश होतो. प्रत्येक खाण्याच्या विकारामध्ये विशिष्ट निकष असतात. ते निदान प्राप्त करण्यासाठी पूर्ण केले जाणे आवश्यक असल्याचेही या संशोधकांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या संशोधनात 10 टक्के मुले त्यांच्या आयुष्यात खाण्यापिण्याचा विकार विकसित करत असल्याचा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे.

खाण्याच्या विकारांमुळे काय होतात परिणाम :खाण्याच्या विकारामुळे कमी हृदय गती आणि इलेक्ट्रोलाइट विकृती धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याचा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे. त्यामुळे कुपोषण वाढ आणि विकासावर परिणाम करू शकते. अनेक रुग्णांमध्ये तरुणपणाची वाढ थांबल्याचे लक्षणे दिसत असल्याचेही या संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हाडांचे आरोग्य, उंची आणि आरोग्याच्या इतर पैलूंवर त्वरीत लक्ष न दिल्यास परिणाम होऊ शकतो. जाणूनबुजून उलट्या होणे, उष्मांक निर्बंध, जास्त प्रमाणात खाणे, जास्त व्यायाम करणे, वजन कमी करण्याच्या पूरकांचा वापर आदी अवेळी खाण्याचा धोका मुलांना होत असल्याचा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे.

आरोग्यावर लक्ष केंद्रित करा आकारावर नाही :कमी किंवा जास्त खाण्यामुळे मुलांच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शरीरातील बदल किशोरवयीन मुलांना अवेळी खाण्यापिण्याचा धोका होऊ शकतो. मुलांच्या विकासामध्ये पालक महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीराचा आकार आणि खाण्याबद्दल पालकांनी नकारात्मक टिप्पणी केल्यामुळे मुलांमध्ये खाण्याच्या विकार वाढत असल्याचेही या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करा, त्यांच्या आकारावर नाही, असेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - Blindness Prevention Week 2023 : जगातील 2.2 अब्ज नागरिकांना आहे दृष्टीदोष ; जाणून घ्या काय आहे अंधत्व प्रतिबंध सप्ताह

ABOUT THE AUTHOR

...view details