नॉर्थ कारोलिना हेल्थ केअर विद्यापीठाद्वारे मास्क संबंधी एक नवे संशोधन करण्यात आले. यात चेहऱ्यावर दुहेरी सुरक्षा आवरण असल्यास ते दुप्पट क्षमतेने प्रभावीपणे सार्स - कोव - २ आकाराचे कण गाळू शकतात, त्यांना नाकावाटे किंवा तोंडावाटे अंदर जाऊ देत नाही, आणि कोरोनापासून सुरक्षा देतात, असे समोर आले आहे.
तुम्ही मास्क कसे घालता हे खूपच महत्वाचे
तुमच्या मास्क घट्ट लागलेला असावा. जर तुम्ही संसर्गजन्य क्षेत्रात नसाल तर तुम्ही तीन थर असलेला मास्क घालायला हवा. पण, जर तुम्ही संभाव्यत: जास्त जोखिमीच्या परिस्थितीत असाल, तर तुम्ही एन ९५ मास्क घालायला हवा. मास्क व्यवस्थित तोंडाला बसला की नाही, हे देखील तुम्ही बघायला हवे. मास्क घालताना तुम्ही तो व्यवस्थित घालायला हवा. गळ्याभोवती मास्क घातल्यास आसपास असलेल्या एखाद्या संसर्गित व्यक्तीमार्फत तुमच्या मास्कवर विषाणू जमा होऊ शकतात. गळ्याभोवती मास्क घातल्यास आपण विषाणूला जमा करण्यासाठी एक बास्केट बनवतो. तोच मास्क नंतर नाकाभोवती लावल्यास त्यातून नाकात विषाणू पोहचवतो. त्यामुळे, जेव्हा तुम्ही मास्क घालाल तेव्हा ते व्यवस्थित घालणे गरजेचे आहे. तो चुकीच्या पद्धतीने घातल्यास तो न घालताना जितका धोका आहे, त्यापेक्षा अधिक धोका तुम्हाला होऊ शकतो. मास्क घातल्याने विषाणूचा प्रसार १० टक्क्यांनी कमी होतो. आणि जेव्हा तुम्ही एन ९५ मास्क घातला तेव्हा तो ९५ टक्क्यांनी कमी होतो.
कामावर असताना काय करावे?
कामाच्या ठिकाणी असताना शक्य असल्यास तुम्ही खोलीतील शेवटच्या भागी जेथे खिडकी आहे, तेथे जावे आणि आपला मास्क काढावा. त्यानंतर ताज्या हवेचा दीर्घ श्वास घ्यावा, परत मास्क चेहऱ्याला लावावा आणि कामावर परतावे. हे करणे महत्वाचे आहे, कारण तुम्ही त्याच हवेचा पुन्हा पुन्हा श्वास घेता.
खरे पाहता कामाच्या ठिकाणी असताना तुम्ही मास्कला हात लावू नये, तसेच काही खावू नये, असे सूचवले जाते. तरी तुम्हाला जर कामावर चहा ब्रेक आवश्यक असल्यास तुम्ही आळीपाळीने मास्क काढायला हवे. उदाहरण, जर एक व्यक्ती चहा पीत असेल, त्यावेळी दुसऱ्यांनी मास्क घालून राहावे. तसेच, मास्क व्यवस्थित लावण्याबाबत दुसऱ्या व्यक्तीला सांगायचे असल्यास, तुम्ही व्यवस्थित मास्क घाला, असे म्हणण्या ऐवजी, तुमचा मास्क घसरला आहे, असे म्हणावे. यातून तुम्हाला पुढच्या व्यक्तीची काळजी आहे, असे त्या व्यक्तीला वाटायला हवे.
मास्क व्यवस्थित तोंडाला लागला आहे की नाही, हे कसे ओळखाल?
- मास्क घातल्यावर जर तुमचा चष्मा दवाने अच्छादला, तर तुमचा मास्क व्यवस्थित लागला आहे. मास्क घातले असताना चष्म्यावरील दव अच्छादन कमी करण्यासाठी देखील उपाय आहेत.
- बोलताना जर मास्क नाकाच्या खाली सरकला, तर तो मास्क बरोबर बसलेला नाही.
मास्क काढताना कुठली काळजी घ्यावी?