महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 4:15 PM IST

ETV Bharat / sukhibhava

Disease X : कोरोनाहून घातक आहे 'ही' नवीन महामारी; घ्या जाणून...

जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की 'डिसीज एक्स'ही एक धोकादायक आंतरराष्ट्रीय महामारी आहे. गेल्या तीन वर्षांपासून जागतिक स्तरावर कोरोनाचा धोका होता. आता देशात नवीन 'डिसीज एक्स'चा धोका आहे. त्यामुळं आरोग्य शास्त्रज्ञांनी यूके आणि अमेरिकेसह अनेक देशांना सतर्क केलं आहे.

Disease X
'डिसीज एक्स

हैदराबाद :कोरोनानंतर आता आणखी एक नवीन आजार 'डिसीज एक्स' हा चर्चेचा विषय बनला आहे. यूकेच्या आरोग्य शास्त्रज्ञ म्हणतात की 'डिसीज एक्स' हा कोविड -19 पेक्षा अधिक धोकादायक आहे. तो आणखी एक साथीचा रोग होऊ शकतो. आरोग्य शास्त्रज्ञांनीही लोकांना या धोकादायक आजाराबद्दल सतर्क केलं आहे.

'डिसीज एक्स' म्हणजे काय ?जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, 'डिसीज एक्स' हा एक नवीन विषाणू आहे. ज्यावर कोणताही इलाज नाही. नोव्हेंबर 2022 च्या अहवालात असा उल्लेख करण्यात आला आहे की 'डिसीज एक्स'चा समावेश अज्ञात रोगजनकाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी करण्यात आला होता. ज्यामुळं गंभीर आंतरराष्ट्रीय साथीचा रोग होऊ शकतो. डब्ल्यूएचओने 2018 मध्ये प्रथमच 'डिसीज एक्स'चा उल्लेख केला. डब्ल्यूएचओची वेबसाइट म्हणते, 'डिसीज एक्स' ही एक धोकादायक आंतरराष्ट्रीय महामारी आहे.

'डिसीज एक्स' मुळे महामारी येऊ शकते : डब्ल्यूएचओने म्हंटलं आहे की, कोरोना नंतर, 'डिसीज एक्स' सारखा गंभीर आजार होऊ शकतो. या साथीचा धोका अजूनही आहे आणि तो आधीच सुरू झाला आहे. 'डिसीज एक्स' हा कोरोनापेक्षा जास्त धोकादायक आहे. आरोग्य शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की या आजाराचा धोका प्रत्येकामध्ये विचारात घेतला जाऊ शकत नाही, परंतु जागतिक स्तरावर मोठ्या लोकसंख्येला या आजाराची लागण होऊ शकते.

विषाणूंवर वैज्ञानिकांचं निरीक्षण : शास्त्रज्ञांनी सांगितलं की आम्ही सुमारे 25 प्रकारच्या विषाणूंवर लक्ष ठेवत आहोत. पूर्वी जनावरं आणि माणसांमध्ये रोगाचा धोका अधिक दिसून येत होता. त्यामुळें अशा आजारांवर अधिक लक्ष दिलं जात आहे.

कोण ठरवतं कोणता रोग जागतिक महामारी बनणार ?असाही प्रश्न उद्भवतो की 'डिसीज एक्स किंवा तत्सम रोग किती धोकादायक आहेत किंवा त्यांच्यामुळे जागतिक महामारी होण्याची शक्यता किती आहे हे कोण ठरवतं? खरं तर डब्ल्यूएचओसह अनेक जागतिक आरोग्य संस्थांमध्ये 300 हून अधिक वैज्ञानिकांची एक टीम कार्यरत आहे, जी सध्या 25 हून अधिक विषाणूजन्य विषाणू आणि बॅक्टेरिया यांच्यावर संशोधन करत आहेत. या शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांची टीम, विषाणू किंवा जीवाणूंच्या संसर्गजन्यतेच्या आधारे, कोणता रोग किती धोकादायक आहे किंवा तो कोणती महामारी आणू शकतो याचा अंदाज लावतो.

भारतातही येऊ शकतो 'डिसीज एक्स' : एक्स डिसीज भारतात येईल की नाही याबाबत काहीही सांगता येत नाही. परंतु हे खरे आहे की जागतिक महामारी म्हणजे एकाच वेळी जगातील अनेक देशांवर परिणाम होतो. भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार, रोजगार आणि पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा देश आहे, जिथं दररोज वेगवेगळ्या देशांतील लोकांची ये-जा असते, त्यामुळं हा आजार भारतात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. World Environmental Health Day : पर्यावरण वाचवण्यासाठी तुमच्या छोट्या छोट्या सवयी बदला, धोक्यांपासून होईल तुमचं रक्षण
  2. World Contraception Day 2023 : जागतिक गर्भनिरोधक दिन 2023; जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व...
  3. World Pharmacist day : आजचा दिवस फार्मासिस्टचं कौतुक करण्याचा दिवस; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

ABOUT THE AUTHOR

...view details