हैदराबाद :हिंदू कॅलेंडरनुसार भगवान दत्तात्रेयांची जयंती शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. भगवान दत्तात्रेय हे तिन्ही देवांचे अवतार मानले जातात. भगवान दत्तात्रेयाकडे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांच्या शक्ती आहेत असं मानलं जातं. यावर्षी 2023 मध्ये दत्तात्रेय जयंती मंगळवार, 26 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाल्याची धार्मिक श्रद्धा आहे. दत्तात्रेयाला देव आणि गुरू ही दोन्ही रूपे आहेत. म्हणून त्यांना श्री गुरुदेव दत्त म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोष काळात झाला. श्रीमद भागवत ग्रंथानुसार, दत्तात्रेयजींनी २४ गुरूंकडे अभ्यास केला. भगवान दत्तांच्या नावाने दत्त पंथाचा उदय झाला. विशेषतः महाराष्ट्रात दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रेयांची पूजा केली जाते. दक्षिण भारतात भगवान दत्तात्रेयांची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत.
दत्तात्रेय जयंतीचे महत्त्व :दत्त जयंती दिवशी भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्यानं प्रलंबित कामं पूर्ण होतात असं म्हणतात. संतानप्राप्तीच्या इच्छेसाठी भगवान दत्तात्रेयांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्यानं जीवनात सुख-समृद्धी येते आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते, असं मानण्यात येतं.
- दत्तात्रेय जयंती 2023 शुभ मुहूर्त :पौर्णिमा तिथी 26 डिसेंबर रोजी सकाळी 5:46 वाजता सुरू होईल आणि 27 डिसेंबर रोजी सकाळी 6:02 वाजता समाप्त होईल.
दत्त जयंती पूजा : मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी गुरूदेव दत्तात्रेयांच्या त्रिदेव रुपाची मोठ्या थाटामाटात पूजा केली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं. भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीवर अगरबत्ती लावून नेवैद्य अर्पण करा असं सांगण्यात येतं. असे मानले जाते की या दिवशी भगवान दत्तात्रेय गंगेत स्नान करण्यासाठी येतात, म्हणून गंगामैय्याच्या तीरावर दत्त पादुका देखील पूजली जातात. या दिवशी दत्तात्रेयांची गुरू म्हणून पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व कामातून निवृत्ती घ्यावी. मग स्वच्छ कपडे घाला. यानंतर पूजास्थळाची स्वच्छता करून व्रताची शपथ घ्या. मंदिरात भगवान दत्तात्रेयांची मूर्ती बसवून त्यावर तिलक लावावा. त्यानंतर त्यांना पिवळी फुले आणि पिवळ्या वस्तू अर्पण करा. यानंतर त्यांच्या मंत्रांचा जप करा आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा. असे पुराण ग्रंथात सांगण्यात आले आहे.
- दत्त जयंती निमित्त तयार करा हा नैवेद्य :प्रत्येक सणामध्ये प्रसाद हा दाखवला जातो आणि त्या प्रसादासाठी वेगवेगळे प्रकारचे नैवेद्य देखील बनवले जातात. दत्त जयंतीचा उत्सव हिवाळ्यात येत असल्याने सुठंवडा हा पदार्थ नैवेद्यासाठी बनवला जातो.