महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Climate Change : तीव्र उष्णतेच्या लाटा का निर्माण होत आहेत? जाणून घ्या कारण - उष्माघात

हवामान बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. मात्र माध्यमातून याबाबत फारसी जनजागृती करण्यात येत नाही. मुंबईत 14 श्री भक्तांचा उष्माघाताने बळी गेल्यानंतर सगळेच खळबळून जागे झाले आहेत.

climate change
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 3, 2023, 2:20 PM IST

हैदराबाद : ( बिलाल भट )मुंबईतील खारघरमध्ये 14 श्री सेवकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती, त्यानंतर उष्माघाताकडे नागरिक गांभीर्याने पाहायला लागले आहेत. वातावरणातील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणामामुळे प्रसारमाध्यमे अलिकडे आकर्षित होऊ लागली आहेत. या घटनेनंतर अनेक माध्यमात प्रसंगी चांगले लिहले जाऊ लागले आहे. मीडिया हाऊस हा विषय इतर कोणत्याही मोठ्या बीटप्रमाणे व्यापक कव्हरेजसाठी पात्र नसल्याचे समजत होते. हे बीट जास्त लक्ष वेधून घेत नसल्याने ते दुर्लक्षित आहे. विशेषत: साथीच्या आजारानंतर आरोग्याने आपली जागा कशीतरी बनविली आहे. परंतु हवामानातील बदल अद्याप माध्यमांना पाहिजे त्या प्रमाणात आकर्षित करू शकलेले नाहीत.

प्रसारमाध्यमांनी जागृती करण्याची गरज :आपणअद्याप उष्माघात हा सनस्ट्रोकचा बदली शब्द म्हणून स्वीकारलेला नाही. उष्णतेने मृत्यू होणाऱ्या व्यक्तींसाठी माध्यमांमध्ये अजूनही सनस्ट्रोक हा शब्द वापरला जातो. उष्णतेच्या लाटा अजूनही गंभीर चिंतेच्या रूपात पाहिल्या जात नाहीत. म्हणूनच नागरिक अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीतून जात असताना काय करावे आणि करू नये याचे पालन फारच कमी करतात. जोपर्यंत प्रसारमाध्यमे व्यापक प्रसार आणि जागृती करणार नाहीत, तोपर्यंत नागरिक उष्णतेच्या लाटेला आवश्यकतेनुसार प्रतिसाद देणार नाहीत.

हिंद महासागर आहे सर्वाधिक उष्ण :मध्यपूर्वेतील उष्णतेच्या लाटा ज्या हिंद महासागराला उष्ण बनवतात. हिंद महासागर हा सर्वात उष्ण महासागरांपैकी एक आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञांना येथील तापमानाचा अंदाज लावताना नेहमीच कसरत करावी लागते. त्यामुळे वाढत्या तापमानाचे परिणाम प्रत्येक भारतीयांना भोगावे लागू शकतात. हिंद महासागर मान्सून ठरवतो, परंतु पॅसिफिकमधून येणारे वारे भारतासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. हिंद महासागरातील उबदार वारे थंड करण्याची क्षमता आहे, त्यामुळे मान्सूनवर परिणाम होतो.

हिंद महासागरामुळे उद्भवतात उष्णतेच्या लाटा :हिंद महासागरामुळे उद्भवणाऱ्या उष्णतेच्या लाटा एका विशिष्ट उंबरठ्याच्या पलीकडे गेल्यास लोकांचा बळी जाण्याची शक्यता असते. तथापि, 2015 पासून मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी, पूर्व चेतावणी प्रणाली मृत्यूचे प्रमाण कमी करू शकते. सरकार, शास्त्रज्ञ आणि तज्ञांच्या मदतीने असुरक्षित समुदायांना हवामान बदलासाठी अधिक लवचिक बनवण्याचा आणि त्याचे धोके कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे उष्णतेचा मानवी जीवनावर परिणाम होऊ शकतो. हीटवेव्ह कृती योजना (HP) अनेक राज्यांनी विकसित केल्या आहेत. यामध्ये अहमदाबाद हे दक्षिण आशियातील पहिले यशस्वी शहर ठरले आहे.

नागरिक पडतात उष्माघाताला बळी :उष्माघात कृती योजना लक्षात घेतल्यास उष्णतेचे परिणाम कमी करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ आवश्यक आहे. स्त्रिया, मुले आणि ६० वर्षांवरील नागरिक उष्णतेला बळी पडतात. यात महिला प्रवासात असताना कमी पाणी पितात. त्यासह महिला प्रवासात असताना वॉशरुमला जाणे टाळतात. त्यामुळे त्यांना लवकर उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता जास्त असते. कामगार, शेतकरी यांना उष्णतेच्या लाटेचा सर्वात जास्त धोका असतो. शेतकरी आणि कामगार जास्त काळ उष्णतेच्या संपर्कात राहतात. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कामगारांचे तब्बल 220 अब्ज तास काम काढून घेतले आहे. यामध्ये 23 दशलक्ष नोकऱ्यांचा समावेश आहे. हे कामगारांचे 20 वर्षांत सरासरी नुकसान असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पुढील 7 वर्षात एकूण कामकाजाच्या तासांचे प्रमाण 25 टक्क्यांनी वाढणार आहे. अति उष्णतेच्या लाटेमुळे होणारे नुकसान हे नुकसान भरपाईसाठी पात्र नसल्याचे पॅरिस कराराच्या कलम 8 नुसार स्पष्ट होते. त्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना नुकसान भरपाई मिळू शकत नाही. उष्णतेमुळे होणारे मृत्यू आणि पीडिताना उष्णतेची लाट ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केल्याशिवाय भरपाई दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

वादळामुळे तब्बल 3 हजार नागरिकांना :हवामान बदलामुळे पर्जन्यमान आणि बर्फवृष्टीच्या पद्धतींवरही परिणाम झाला आहे. अगोदर ज्या भागात जास्तकाळ दुष्काळ पडायचा तिथे आता पूर येत आहे. तर ज्या परिसरात जास्त पाऊस पडायचा तिथे आता दुष्काळ पडत आहे. आंध्र प्रदेशातील चितूर, तिरुपती या दुष्काळग्रस्त भागात पूर येत आहे. तर कधी कधी झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशातून दुष्काळाच्या बातम्या येत आहेत. अचानक पूर येणे, विजांचा कडकडाट आणि गडगडाट या बातम्या आता सामान्य झाल्या आहेत. विजांचा कडकडाट आणि गडगडाटामुळे होणारे मृत्यू ही देखील एक नवीन संकट निर्माण झाले आहे. विजेच्या कडकडाटांसह वादळाने सुमारे 3 हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हिमवर्षाव आणि त्यानंतर हिमस्खलनाचे प्रमाणही वाढले आहे. झपाट्याने पाण्याखाली जाणाऱ्या क्षेत्रामुळे बर्फ पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी बर्फ वितळण्यास सुरुवात होते. आता हिमवर्षावाची वेळ फेब्रुवारी आणि मार्चमध्ये बदलली आहे. मात्र अगोदर बर्फवृष्टी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पडायचा.

हवामान बदलाला जंगलातील वणवा आहे कारणीभूत :जंगलातील आगीमुळे हवामान बदलावर चांगलाच परिणाम झाला आहे. याआधी कधीही जंगलात आग न लागलेल्या ठिकाणी प्राणी आणि पक्षी आगीत भाजल्याच्या घटना घडल्या आहेत. पक्षी पावसाळ्यापूर्वी प्रजनन काळात असताना मार्च महिन्यात जंगलाला लागलेली आग अधिक विनाशकारी असते. जंगलात लागलेल्या आगीमुळे त्यांचा नाश होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोव्यासारख्या ठिकाणी जंगलात आग लागली होती. त्याचप्रमाणे ईशान्येतील डझुकू व्हॅलीमध्येही यापूर्वी कधीही न घडलेल्या जंगलात आगीच्या घटना घडल्या होत्या. हा नवा ट्रेंड हवामान बदलाचा परिणाम म्हणून पाहिला जात आहे.

किनारपट्टीवरील नागरिकांनाही धोका :केवळ जंगलात राहणाऱ्यांनाच नाही, तर किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांच्या अस्तित्वालाही संकटाने वेढले आहे. अनेक बेटे गायब झाल्याने शास्त्रज्ञांनी किनारी भागात आणखी पूर येण्याची शक्यता वर्तवली आहे. महासागराचे वाढते पाणी बेटांसह किनारी भागांना धोका दर्शवत आहेत. पश्चिम किनार्‍यावरील चक्रीवादळाने हजारो नागरिकांचा बळी घेतला असून हे नवीन चक्रीवादळाचा मार्ग कसा विकसित झाला, हे धक्कादायक आहे. हवामान बदल आणि त्याचे परिणाम या समस्येला कसे सामोरे जावे यावर चर्चा करण्यासाठी सरकार वैज्ञानिक आणि तज्ज्ञांसोबत चर्चा करत आहे. समस्या कमी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सरकार अनुकूलतेवर लक्ष केंद्रित करत आहे. मात्र काही तज्ञ सरकारच्या मताशी असहमत आहेत.

हेही वाचा - World Press Freedom Day 2023: आतापर्यंत पत्रकारांच्या झाल्या 'इतक्या' हत्या, अनेकांवर झालेत हल्ले

ABOUT THE AUTHOR

...view details