हैदराबाद:हिवाळा येताच चेहऱ्याची चमक कमी होते. त्वचा कोरडी आणि निर्जीव होत असते. त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. थंडीचा परिणाम चेहऱ्यावर आणि ओठांवर सर्वाधिक दिसून येतो. हिवाळ्यात, बहुतेक लोकांना फाटलेले ओठ आणि कोरड्या त्वचेचा त्रास होतो. फाटलेल्या ओठांच्या समस्येने तुम्हाला त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. चला तर याविषयी जाणून घेऊया...(Home Remedy For Dry Lips)
स्क्रब करा: टोमॅटोवर साखर टाका आणि नंतर हलक्या हाताने ओठ स्क्रब करा (Tomato-Sugar Scrub for Lips), असे केल्याने ओठांची डेड स्किन निघून जाईल आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून आराम मिळेल.
बदामाचे तेल:हिवाळ्यात झोपण्यापूर्वी दररोज ओठांना बदामाचे तेल लावा. ओठांना तेल लावल्यानंतर 5 मिनिटे मसाज करा. यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतील.
झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर क्रीम लावा:ब्युटी एक्सपर्टच्या मते, फाटलेल्या ओठांवर क्रीम्सही खूप प्रभावी असतात. तुम्ही रोज झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर क्रीम लावा आणि दोन मिनिटे ओठांना मसाज करा. यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल आणि ओठ मऊ होतील.