ठराविक वयानंतर स्त्री आणि पुरुषांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा आपोआप विकसित होत असते. ही शरीराची नैसर्गिक गरजही मानली जाते. कारण यामुळे फक्त शारीरिक नाही तर मानसिकही फायदा होत असतो. पण नेहमी असेच नाही घडत. काही स्त्रिया, तसेच पुरुष लैंगिक संबंध ठेवण्यासाठी फार उत्साही नसतात. शारीरिक संबंधांबद्दल या इच्छा आणि अनिच्छा अनेकविध कारणांमुळे उद्भवतात. म्हणूनच 'ईटीव्ही सुखीभव' लैंगिक इच्छांवर परिणाम करणारे घटक आणि लैंगिक जीवनाशी संबंधित काही विशेष गोष्टींबद्दल माहिती वाचकांसमोर ठेवत आहे.
सेक्स करताना आनंद का मिळतो?
चांगल्या शारीरिक संबंधांदरम्यान शरीरात निर्माण होणारी उत्तेजना आणि या वेळी वाहणारे हार्मोन्स केवळ शरीरच नव्हे तर मेंदूलाही आनंद आणि समाधानी बनवतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता, शारीरिक संबंधांदरम्यान, आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. त्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक असतात. सन १९६० मध्ये शारीरिक संबंधांवर केलेल्या संशोधनात विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन या संशोधकांनी लैंगिक उत्तेजन म्हणजेच सेक्सुअल अराउजल देण्याच्या चार प्रकारांचा उल्लेख केला आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.
- उत्तेजना म्हणजेच एक्साइटमेंट : शारीरिक संबंधांमध्ये उत्तेजना महत्वाची असते. या अवस्थेत लिंग, योनी यामध्ये म्हणजेच क्लिटोरिसमध्ये असलेल्या तंतूंमध्ये पुरेशा प्रमाणात रक्त भरले जाते. अशा परिस्थितीत या विशिष्ट ठिकाणी नसांची संवेदनशीलताही वाढते. यामुळे अर्धपारदर्शक अशा पदार्थाची निर्मिती होते. त्याने योनीमध्ये ओलसरपणा वाढतो.
- उत्तेजना वाढत जाणे : सेक्स करते वेळी एका क्षणी उत्तेजना वाढत जाते. योनी, लिंग तसेच क्लिटोरिस जास्त संवेदनशील होतात. या वेळी संवेदनांमध्येही बदल होत जातो. कधी उत्तेजना वाढते, तर कधी कमी होते.
- भावनोत्कटता म्हणजे ऑर्गेझम : सेक्स करताना स्नायूंचे आकुंचन झाल्याने स्त्री आणि पुरुष ऑर्गेझमचा अनुभव घेतात. पण स्त्री आणि पुरुषात हे वेगवेगळ्या पातळीवर असते. स्त्रियांमध्ये जास्त करून क्लिटोरलमध्ये उत्तेजना आल्याने परमसुखाचा आनंद घेता येतो. स्त्रियांमध्ये ऑर्गेझमची अनुभूती लवकर येऊ शकते. तर पुरुषांमध्ये लिंगाचे वरचे टोक उत्तेजित झाल्याने ऑर्गेझमचा अनुभव येतो.
जास्त करून पुरुषांमध्ये ऑर्गेझम आल्यानंतर वीर्य पतन होते. पण वीर्य पतन न होता ते ऑर्गेझमचा अनुभव घेऊ शकतात. असेही होऊ शकते. पुरुषांमध्ये लिंग, गुदाशय आकुंचन पावते, तर स्त्रियांना योनी, गर्भाशय, गुदाशय इथे संवेदना जाणवतात.
- संकल्प म्हणजे रिझोल्युशन : संशोधनानुसार कामोत्तेजनेसाठी संकल्पाचीही गरज असते. हा संकल्प चांगल्या सेक्सच्या प्रयत्नासाठी नाही तर ऑर्गेझमच्या अगोदर आणि नंतर शरीराची प्रक्रिया, प्रतिक्रिया आणि स्थिती कशी आहे, हे पाहण्यासाठी असतो. ही स्थिती स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगवेगळी असते. पुरुषांना वीर्य पतन झाले की ऑर्गेझमचा अनुभव येतो. पण स्त्रियांना तसाच अनुभव येईल, हे गरजेचे नाही.