महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Prevention of Fungal Infection : सावधान! 'या' कारणामुळे होऊ शकतो फंगल इन्फेक्शनचा भयंकर त्रास

फंगल इन्फेक्शनने (fungal infection) त्रस्त असणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन लक्ष दिले नाही तर एका काळानंतर (fungal infection may increases) वाढत जाते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो? याबाबत आज पाहुयात...

By

Published : Oct 20, 2022, 1:16 PM IST

फंगल इन्फेक्शन
Fungal Infection

फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) म्हणजेच बुरशीजन्य संसर्ग हा त्वचेचा संसर्ग आहे. मानवांमध्ये, जेव्हा बुरशीचे शरीरातील एखाद्या भागावर आक्रमण होते आणि रोगप्रतिकारक शक्ती (immune system) त्यांच्याशी लढण्यास कमी पडते तेव्हा फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संक्रमण) उद्भवते. ही एक सामान्य समस्या आहे परंतु वेळेवर उपचार न केल्यास ते गंभीर रुप धारण (It may be dangerous) करू शकते. हा रोग त्वचेपुरता मर्यादित नाही परंतु त्यामध्ये हाडे आणि शरीराच्या इतर सर्व अवयवांवर परिणाम होण्याची शक्यता असते.

इन्फेक्शनचे प्रकार (Types of Fungal Infection) : 1. कँडीडा अल्बिकन्स :हे एक फंगल इन्फेक्शन असून ते त्वचेवर, तोंडाजवळ किंवा गुप्तांगाजवळच्या ओलसर त्वचेवर होते. 2. रिंगवर्म : हे सुद्धा एक फंगल इन्फेक्शन आहे. जे प्रामुख्याने त्वचेवर, डोक्याच्या त्वचेवर, पायांना, मांडीवर आणि गुप्तांगाजवळ होते. फंगल इन्फेक्शन होण्याची कारणे : उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते. ओले कपडे घालणे. ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

कमजोर रोगप्रतिकार शक्ती : प्रतिजैविक औषधांचे दुष्परिणाम, खुप वेळ मोजे घालणे, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे, घट्ट शूज किंवा कपडे घालणे. लहान बाळा पासून ते म्हातार्‍या माणसापर्यंत कोणालाही हे इन्फेक्शन (बुरशीजन्य संक्रमण) होऊ शकते. काय काळजी घ्यावी? : वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या. स्नानगृह किंवा सार्वजनिक आंघोळीच्या ठिकाणी स्वच्छता बाळगा. सतत एकच मोजे घालू नका. खूप घट्ट शूज घालू नका. कोणाचीही वस्तू वापरू नका. 2.5 PH चे ॲसिडीक पाणी दिवसातुन 3-4 वेळा बाधित जागेवर स्प्रे करावे.

फंगल इन्फेक्शन कशामुळे होते (Reasons of Fungal Infection) :फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संक्रमण) होण्याची अनेक कारणे आहेत जी बुरशीच्या वाढीस कारण बनतात. जेव्हा प्रायव्हेट पार्टच्या पीएच व्हॅल्यूमध्ये बदल होतो. ज्या व्यक्ती प्रायव्हेट पार्ट्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. एचआयव्ही संसर्ग, कर्करोग, मधुमेह यासारख्या आजारांमुळे देखील बुरशीजन्य संसर्ग होतो. अशा रुग्णांमध्ये कॅंडिडाचा संसर्ग सर्वसामान्यपणे दिसून येतो. हे अगदी सर्वसामान्य फंगल इन्फेक्शन मानले जाते. फंगल इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने देखील हा संसर्ग होऊ शकतो.

वजन आणि लठ्ठपणा : फंगल इन्फेक्शन होण्यास जास्त वजन आणि लठ्ठपणा देखील कारण बनू शकतो. मांडीवर जादा चरबी असेल आणि आपण दीर्घकाळ सायकलिंग किंवा जॉगिंग करत असाल तर त्यामुळे या भागात जास्त ओलावा तयार होतो आणि त्या भागावरील त्वचा चोळण्यात येते. सतत चोळण्यामुळे त्वचेवर पुरळ होऊ शकते. ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतात. अत्यधिक घाम येणे हे या इन्फेक्शनचे कारण असू शकते. अनुवंशिक घटक देखील या फंगल इन्फेक्शनचे मुख्य कारण आहे. स्त्रियांमध्ये सॅनिटरी पॅडमुळे ही मांडीच्या सभोवतालच्या भागात संक्रमण होऊ शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details