अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाच्या विश्लेषणानुसार (meta-analysis) नियमित टार्ट चेरी ज्यूस पिणाऱ्या लोकांमध्ये केवळ शरीराची कार्यक्षमताच वाढत नाही, तर विविध कारणांमुळे हानी झालेल्या स्नायूंना पुन्हा तयार करण्यास मदत मिळते. त्याचबरोबर, या ज्यूसमुळे त्यांची व्यायाम करण्याची क्षमता देखील सुधारते.
टार्ट चेरीज्यूसवरील अभ्यासाचा निकाल
टार्ट चेरीचा अर्क (concentrate) व्यायामात सातत्य राखण्यासाठी फायदेशीर असल्याचे अभ्यासाच्या निकालांमध्ये समोर आले आहे. त्याचबरोबर, टार्ट चेरीचा अर्क त्याच्या लो ग्लायसेमिक इंडेक्स, अँटी - इन्फ्लामेटोरी, अँटी - ऑक्सिडेटिव्ह क्षमता आणि ब्लड फ्लो एन्हान्सिंग इफेक्ट्सच्या माध्यमातून व्यायाम करण्याची क्षमता (enhance endurance exercise performance) वाढवू शकते.
कॅनडा येथील सस्कॅचेवान विद्यापीठाशी संबंधित आणि या संशोधनाचे सह - लेखक फिलिप चिलीबेक सांगतात की, या विश्लेषणाच्या (meta-analysis) निकालांमध्ये असे दिसून आले की, टार्ट चेरीच्या नियमित सेवनाने सहभागी लोकांची कामगिरी सुधारली. याचे कारण समजण्यासाठी संशोधनात तपशीलवार अभ्यास देखील करण्यात आला. या नवीन विश्लेषणात टार्ट चेरी आणि शरीरावर त्याचे परिणाम यावर 10 अभ्यास करण्यात आले होते. या संशोधनातील सहभागींचे वय सरासरी 18.6 ते 34.6 वर्षे होते. या 10 अभ्यासांमध्ये एकूण 127 पुरुषांचा आणि 20 महिलांचा समावेश होता. यातील बहुतांश सहभागी व्यायाम आणि क्रिडा प्रशिक्षित व्यक्ती होते, त्यात सायकलस्वार, धावपटू आणि ट्रायथलेट्स होते.
या अभ्यासात सहभागी व्यक्तींना चाचणीपूर्वी सात दिवस वेगवेगळ्या स्वरुपात टार्ट चेरी देण्यात आली जसे, पावडर आणि अर्क. 10 अभ्यासांतील 2 मध्ये टार्ट चेरी खालल्यानंतर सहभागी व्यक्तींची कामगिरी सुधारल्याचे दिसत होते.
टार्ट चेरी ज्यूसचे फायदे
टार्ट चेरी ज्यूस हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे जसे, विटामिन बी, कॅल्शियम, लोह (iron), मॅग्नेशियम, ओमेगा - 3, ओमेगा - 6 आणि अँटिऑक्सिडेंट इत्यादी. यांसह त्याच्यामध्ये काही वनस्पती संयुगे (plant compounds) असतात जे आरोग्यासाठी फायद्याचे असतात. या संदर्भात केलेल्या विविध संशोधनांच्या निकालांनुसार, चेरी ज्यूसच्या नियमित वापराचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.