हैदराबाद :स्वयंपाकात कांद्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. भाज्यांची ग्रेव्ही बनवण्यासाठी असो किंवा सॅलडच्या स्वरूपात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपण कांदा वरचा पापुद्रा काढून सोलल्यानंतर वापरतो आणि त्याची साल फेकून देतो. पण केवळ कांदाच नाही तर त्याची ही साल देखील अनेक प्रकारे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कांद्याची साल तुमच्या आरोग्यासाठी आणि केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई त्याच्या सालीमध्ये आढळते, जे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी चांगले आहे. कांद्याची साल त्वचेवरील डाग, मुरुम आणि संसर्गापासून आराम देते. चला तर मग जाणून घेऊया कांद्याची साले त्वचेसाठी कशी फायदेशीर आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा.
कांद्याच्या सुकलेल्या पापुद्र्याचे अनेक फायदे, फेकून देत असाल तर हे नक्की वाचा - भाज्यांची ग्रेव्ही
Benefits Of Onion Peel : कांद्याचा वापर स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केवळ कांदाच नाही तर त्याचे वरचे सुकलेले पापुद्रे तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कांद्याचा त्वचेसाठी कसा फायदा होऊ शकतो. त्यांच्या या सालीचा वापर कसा करायचा.
कांद्याची साले
Published : Dec 4, 2023, 12:34 PM IST
त्वचेसाठी कांद्याच्या सालीचे फायदे :
- कांद्याची साल चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतात.
- कांद्याची साल त्वचेला चमकदार बनवते आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते.
- कांद्याच्या सालीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील सूज दूर होते.
- कांद्याच्या सालीमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेवर पुरळ येण्यापासूनही आराम मिळतो.
- कांद्याची साल पेस्ट : कांद्याच्या सालीची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. यासाठी मिक्सरमध्ये कांद्याची साल घालून बारीक वाटून घ्या आणि नंतर 10-15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. ते कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा, पुसून घ्या आणि लोशन लावा. ही पेस्ट लावल्यानंतर तुम्हाला खाज किंवा लालसरपणा जाणवत असेल तर वापरू नका.
- कांद्याची साल आणि हळद: कांद्याच्या सालीची पेस्ट बनवा, त्यात हळद घाला आणि फेसपॅक म्हणून लावा. हा पॅक १५ मिनिटे लावल्यानंतर पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या त्वचेवर चमक येईल आणि डाग दूर होतील.
- कांद्याच्या सालीचे पाणी प्या: रात्रभर पाण्यात भिजवलेल्या कांद्याचे साल त्यातील सर्व सार पाण्यात सोडतात. हे पाणी अतिशय आरोग्यदायी आहे. पाणी स्वच्छ असल्याची खात्री करा. नंतर गाळून घ्या. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. जर तुम्हाला त्याची चव आवडत नसेल तर तुम्ही त्यात मध आणि लिंबाचा रस घालू शकता.
- त्वचेवर क्लिन्झर म्हणून वापरा : जर तुम्हाला हे पाणी प्यायचे नसेल तर त्याचा क्लिंजर म्हणून वापर करा. कापसाच्या तुकड्यावर रात्रभर भिजवलेल्या कांद्याच्या सालीचे पाणी घ्या आणि त्याने त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा. बाटलीत भरूनही ठेवू शकता. पण ताजे पाणी वापरले तर चांगले होईल. सकाळी एकदा आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी एकदा या क्लिंजरचा वापर केल्यास चांगला परिणाम होईल.
हेही वाचा :