हैदराबाद : दुसऱ्या महायुद्धाला अॅडॉल्फ हिटलर जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतो. अॅडॉल्फ हिटलर या हुकूमशहाने जगभरातील ज्यू लोकांची हत्या केल्याने हिटलरवर जगभरातून टीका करण्यात येते. अॅडॉल्फ हिटलर हा जर्मनीचा हुकूमशहा होता. जर्मनीच्या पराभवाला ज्यू नागरिक जबाबदार असल्याने हिटलरने ज्यू नागरिकांच्या हत्या घडवून आणल्या. त्यामुळे हिटलर जगभरात कुप्रसिद्ध झाला. अॅडॉल्फ हिटलरचा जन्म 20 एप्रिल 1889 ला झाला. त्यामुळे 20 एप्रिल हा जगाच्या इतिहासात काळा दिवस असल्याचे मानले जाते.
कोण होता अॅडॉल्फ हिटलर :अॅडॉल्फ हिटलरचा जन्म 20 एप्रिल 1889 ला अॅलॉइस व क्लारा या दाम्पत्याच्या पोटी ऑस्ट्रियातील ब्रानो आम इन येथे झाला. अॅडॉल्फ हिटलरचे वडील अॅलॉइस हे सैन्यात अधिकारी होते. अॅडॉल्फ हिटलरने आपल्या अगोदरच्या संघर्षाच्या काळात व्हिएन्नाच्या रोडवर चित्रे काढून आपला चरितार्थ चालवला, रस्त्यावरचा बर्फ साफ केला तर नागरिकांच्या घराला रंग देऊनही आपली उपजिविका चालवली. अॅडॉल्फ हिटलरचे प्राथमिक शिक्षण लिंज येथे झाले. मात्र हिटलर 17 व्या वर्षाचा असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याने व्हियन्नाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिले जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानंतर हिटलरने सैन्यात भरती होऊन अनेक लढायात भाग घेतला.