सोशल मीडियाच्या विविध प्लाटफॉर्मवर कोणत्याही पोस्टला लाइक किंवा शेअरची संख्या केवळ पोस्ट करणाराच नव्हे तर, त्या पोस्टच्या प्रसिद्धीचे प्रतिक मानले जाते. मात्र, वर्तमान काळात या प्लाटफॉर्मवर भाषिक प्रदूषणाचा कल वाढू लागला आहे, म्हणजेच लोक आपल्या भावनांच्या अभिव्यक्तीसाठी अपमानास्पद किंवा संतप्त भाषा अधिक वापरू लागले आहेत. अशा भाषेचा वापर करणाऱ्यांना लाइक आणि शेअर अधिक मिळतात, हे देखील यामागचे एक कारण आहे.
येल विद्यापीठाच्या एका नव्या संशोधनातून असे लक्षात आले आहे की, ट्विटर सारखे सोशल मीडिया प्लाटफॉर्म लोकांमध्ये नैतिक आक्रोशच्या अभिव्यक्तीला वाढवतात, कारण असे केल्यास वापरकर्त्याला लाइक आणि शेअर अधिक मिळतात.
सोशल मीडिया उत्तेजना (social media stimuli) ऑनलाइन आपल्या राजकीय संभाषणाचे स्वर बदलण्यास सक्षम आहेत, असे या आभ्यासात येल विद्यापीठाचे पदव्युत्तर (मानसशास्त्र) संशोधक आणि लेखक विलियम ब्रेडी स्पष्ट करतात.
संशोधन विलियम ब्रेडी आणि त्यांचे सहयोगी प्राध्यापक मॉली क्रोकेट यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. या संशोधनादरम्यान संशोधकांनी वास्तविक जीवनात वादग्रस्त घटनांदरम्यान ट्विटरवर नैतिक आक्रोशाच्या अभिव्यक्तीचे मोजमाप केले. सोबतच सोशल मीडिया यंत्रणेची चाचणी करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या नियंत्रण प्रयोगांमध्ये स्बजेक्ट्सच्या त्या वर्तनाची तपासणी केली जी यूजरला सोशल नेटवर्किंग साइटवर लोकप्रिय सामग्री टाकण्यासाठी पुरस्कृत करतात.
आभ्यासाच्या निष्कर्षात ब्रेडी सांगतात की, हे या बाबीचा पुरावा आहे की, काही लोक कालांतराने अधिक क्रोध व्यक्त करणे शिकतात, कारण त्यांना सोशल मीडियावर या प्रकारचे वर्तन दाखवण्यासाठी पुरस्कृत केले जाते.
संशोधक सांगतात की, या प्रकारचा नैतिक आक्रोश सामाजाच्या चांगल्यासाठी एक बळकट शक्ती देखील बनू शकते, जी नैतिक गुन्ह्यांसाठी शिक्षेला प्रोत्साहित करू शकते आणि समाजिक सहकार्य वाढवू शकते. पण, या प्रवृत्तीची एक काळी बाजू देखील आहे, जी अल्पसंख्याक गटांचा छळ, चुकीच्या माहितीचा प्रसार आणि राजकीय ध्रुवीकरणात योगदान देते.
उल्लेखनीय म्हणजे, फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया साइट्स, असा युक्तिवाद करतात की, ते कुठल्याही प्रकारच्या संभाषणासाठी एक तटस्थ व्यासपीठ देतात. मात्र, अनेक लोकांचा या विचारसरणीवर विश्वास आहे की, सोशल मीडियावरील हे वर्तन लोकांमध्ये रागाच्या प्रवृत्तीला उत्तेजन देते. पण, संशोधकांचा असा विश्वास आहे की, नैतिक आक्रोश सारख्या गुंतागुंतीच्या सामाजिक अभिव्यक्तींना अचूकपणे मोजणे हे एक तांत्रिक आव्हान आहे.