महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Covid Vaccination: लसीकरणानंतर ही सहा महिन्यानंतर तीस टक्के लोकांची रोग प्रतिकारक शक्ती संपते: वैद्यकीय अभ्यासातून स्पष्ट - रोगप्रतिकार शक्ती

कोविड संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे विक्रमी लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ही एआयजी हॉस्पिटल्सच्या नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, लस घेतल्यानंतर ही सहा महिन्यांनंतर तीनपैकी एक व्यक्ती आपली रोगप्रतिकार शक्ती गमावत (Loss of immunity) आहे.

Covid vaccination
Covid vaccination

By

Published : Jan 20, 2022, 4:15 PM IST

एशियन हेल्थकेअर फाऊंडेशनसह (Asian Healthcare Foundation) एआयजी हॉस्पिटल्सच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ज्या लोकांनी 6 महिन्यांनंतर लस घेतलेली आहे, त्यांनी प्रतिकारशक्ती गमावली आहे. ते प्रामुख्याने 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या विकारांनी ग्रस्त होते. या लोकांना पूर्ण लसीकरणानंतर सहा महिन्यांनी अँटीबॉडीचा प्रतिसाद खुप कमी असतो. त्यामुळे त्यांना SARS-CoV-2 संसर्गाचा धोका जास्त असतो.

निष्कर्षात असे आढळून आले आहे की, सहा महिण्यांनतर या असुरक्षित लोकांना बूस्टर डोसच्या गरजेवर जोर द्यावा लागतो. आम्ही देशभरात संक्रमणाचे प्रमाण वाढताना पाहत आहोत. सुदैवाने, लसीकरणाचे वाढते परिणाम, या प्रकाराचे स्वतःचे आंतरिक स्वरूप आणि लोकसंख्येमधील नैसर्गिक प्रतिकारशक्ती यासह अनेक कारणांमुळे रोगाची तीव्रता सौम्य आहे. असे एआयजी हॉस्पिटलचे (AIG Hospitals ) अध्यक्ष डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांनी एका निवेदनात सांगितले आहे.

अभ्यासाचे उद्दिष्ट हे आहे की, लसींची दीर्घकालीन परिणामकारकता समजून घेणे. त्याचबरोबर शक्य तितक्या लवकर बूस्टरची आवश्यकता असलेले काही विशिष्ट लोकसंख्या आहे का ते तपासणे आहे," त्यांनी पुढे नमूद केले की, संपूर्ण लसीकरण झालेल्या 1,636 आरोग्यसेवा कर्मचार्‍यांच्या मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यात आला आहे.

त्यामधून संशोधकांनी सर्व सहभागींमध्ये SARS-CoV-2 साठी IgG अँटी-S1 आणि IgG अँटी-S2 अँटीबॉडीज मोजले. त्यालरुन असा अंदाज आहे की 100 AU/mL ची अँटीबॉडी पातळी ही विषाणूपासून संरक्षणासाठी किमान पातळी आहे, याचा अर्थ 100 AU/mL पेक्षा कमी अँटीबॉडीज पातळी असलेल्या कोणालाही संसर्ग होण्याची शक्यता असते.

15 AU/mL पेक्षा कमी अँटीबॉडीज पातळी असलेल्या लोकांना अँटीबॉडी निगेटिव्ह मानले जात असे. याचा अर्थ त्यांनी विषाणूविरूद्ध कोणतीही संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती विकसित केलेली नव्हती. एकूणच, 6 टक्के लोकांनी कोणतीही रोगप्रतिकारक शक्ती विकसित केली नाही, असे डॉ. रेड्डी म्हणाल्या. परिणाम स्पष्टपणे सूचित करतात की, वयानुसार प्रतिकारशक्ती कमी होत जात असते. याचा अर्थ असा की वृद्ध लोकांपेक्षा तरुण लोकांमध्ये अँटीबॉडीची (High levels antibodies in young people) पातळी अधिक असते.

सध्या, बूस्टर डोससाठी नऊ महिन्यांचे कालावधीचे अंतर आहे. ज्याचा फायदा ७० टक्के लोकसंख्येला होतो, जे सहा महिन्यांनंतर पुरेशी अँटीबॉडी पातळी राखू शकतात. तसेच, आपल्या देशातील प्रमाण पाहता, 30 टक्के लोक विशेषत: उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी सारख्या कॉमोरबिड परिस्थितींनी ग्रस्त आहेत. ज्यांना संपूर्ण लसीकरणानंतर सहा महिन्यांनी संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यांना देखील प्रतिबंधित केले पाहिजे. त्याचबरोबर डोससाठी विचार करणे आवश्यक आहे, असे डॉ. रेड्डी यांनी नमूद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details