महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये मुलीचे प्रेम मान्य नसल्याने युवकाचा साथीदारांच्या मदतीने खून - खून

आर्णी शहरातील कुंटणखाना चालवणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडल्याने ३२ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे.

यवतमाळमध्ये मुलीचे प्रेम मान्य नसल्याने युवकाचा साथीदारांच्या मदतीने खून

By

Published : Jun 3, 2019, 9:49 PM IST

यवतमाळ- आर्णी शहरातील कुंटणखाना चालवणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडल्याने ३२ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या आईसह 2 आरोपींनी ड्रीम लॅन्ड सिटी परिसरात सोमवारी चाकूने भोसकून ही हत्या केली आहे. अकील शब्बीर खान (३२ रा.देऊरवाडा पुनर्वसन) आर्णी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची तक्रार मृताच्या मोठ्या भावाने पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनेतील तीन्ही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पोलीससुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकील शब्बीर खान याचे सोनू रामटेक हिच्यासोबत गेल्या १ वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र, सोनूची आई मंदा रामराव रामटेक (रा. ड्रीम लॅन्ड सिटी), सतीष जमदाडे (रा. देऊरवाडा पु.) आणि नितीन कदम (रा. पुसद) यांना हे प्रेम मान्य नव्हते. त्यामुळे तिघांनी संगनमत करून अकील शब्बीर खान खून केला.

यवतमाळमध्ये मुलीचे प्रेम मान्य नसल्याने युवकाचा साथीदारांच्या मदतीने खून

राहुल कोसळकर याचा वाढदिवस असल्याने आकाश गीरोळकर, अविनाश वाठोरे आणि मृत अकील खान हे 4 जण वाढदिवस साजरा करण्यासाठी माही रेस्टॉरंट आर्णी येथे गेले होते. त्यावेळी पार्टी करत असताना अकील कोणाचा तरी फोन आला. त्यामुळे अकील दहा मिनिटात येतो, असे सांगून निघुन गेला. त्यानंतर तो बराच वेळ आला नाही. त्यामुळे मित्रांनी त्याला फोन केला. तेव्हा अकील मित्रांना म्हणाला, तुम्ही लवकर सोनाली रामटेकेच्या घरासमोर या. त्याचे मित्र त्या ठिकाणी पोहचले असता अकीलचा खून झाला होता. त्यावेळी त्यांनी अकीलला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक अमरसिंग जाधव आणि दारव्हाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

या घटनेतील मंदा रामटेके आणि नितीन कदम या 2 आरोपींना पोलिसांनी नांदेड येथून अटक करण्यात आली. तर उर्वरित 1 आरोपी सतीश जमदाडे फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक यशवत बाविस्कर यांनी आदिलाबाद आणि नागपुर येथे पथक रवाना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details