यवतमाळ - बहुप्रतिक्षित विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत. त्यांना 298 मते मिळाली. तर भाजप उमेदवार सुमित बाजोरिया यांना 185 मते मिळाली. सहा मते अवैध निघाली.
विधानपरिषद पोटनिवडणूक निकाल : महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी - yavatmal elections
यवतमाळमधील विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत.
निवडणुकीपूर्वी यवतमाळमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी शिवसैनिकांची होती. परंतु, महाविकास आघाडीकडून चतुर्वेदींना तिकीट देण्यात आले. 489 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून शंभर टक्के मतदान केले आहे. महाविकास आघाडीचे एकूण 247 मतदार आहे, तर भाजपकडे 185 मतदार आहेत. यामध्ये 244 महिला मतदार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थामधील एकूण संख्याबळामध्ये भाजप 180, शिवसेना 101, राष्ट्रवादी 55, काँग्रेस 80, अपक्ष 55, बसप 2, एमआयएम 8, सप 2, असे पक्षीय बलाबल आहे. यामध्ये पंचायत समिती सभापती भाजप 5, शिवसेना 6, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 3 असे एकूण 489 मतदार आहेत.