महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये जाणवलेल्या भूकंपाचे केंद्र यवतमाळ; मात्र जीवितहानी नाही - जिल्हाधिकारी - नांदेडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

नांदेडमध्ये जाणवलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र, केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर आजूबाजूच्या गावांमध्ये भूकंपाचे कोणतेही धक्के जाणवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

Yavatmal is the epicenter of the earthquake felt in Nanded
नांदेडमध्ये जाणवलेल्या भूकंपाचे केंद्र यवतमाळ; मात्र जीवितहानी नाही - जिल्हाधिकारी

By

Published : Jul 11, 2021, 3:20 PM IST

यवतमाळ -आज सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र, केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर आजूबाजूच्या गावांमध्ये भूकंपाचे कोणतेही धक्के जाणवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच यामुळे कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महागाव तहसीलदारांनी गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

प्रतिक्रिया

जीवित व वित्तहानी नाही -

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मुडाना आणि साधूनगर परिसरात या भूकंपाचे केंद्र दाखवले असून त्याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी नोंदवली आहे. केंद्रबिंदूच्या ठिकाणी शेती भूभाग आहे. मात्र, आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे महागाव तहसीलदार नामदेव इसळकर यांनी सांगितले. केंद्रबिंदूच्या गावांमध्ये त्यांनी भेट देऊन नागरिकांकडून माहिती घेतली. आजूबाजूच्या 10 किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये पोलीस पाटलांकडून माहिती घेतली असता कुठेही धक्के जाणवले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच या भूकंपामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याचेही ते म्हणाले. त्यासोबतच प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, असे उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी सांगितले.

हेही वाचा -केंद्रीय सहकार मंत्रालयाचा राज्यातील सहकारावर परिणाम होईल या चर्चेत तथ्थ नाही -शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details