यवतमाळ- जिल्ह्यात मागील 24 तासात 1 हजार 48 नवे रुग्ण आढळले असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 640 जणांनी कोरोनावर मात केली. मृतांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 19 तर खासगी रुग्णालयातील सहा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार 48 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये 598 पुरुष आणि 450 महिला आहेत. तसेच यात यवतमाळ येथील 284 पॉझिटिव्ह रुग्ण, पुसद 93, पांढरकवडा 110, उमरखेड 127, कळंब 53, वणी 51, दिग्रस 36, मारेगाव 39, घाटंजी 9, आर्णि 34, बाभुळगाव 17, नेर 36, महागाव 51, झरीजामणी 65, दारव्हा 19, राळेगाव 15 आणि इतर शहरातील 9 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 369 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. यापैकी रुग्णालयात 2 हजार 641 तर गृह विलगीकरणात 2 हजार 728 रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 39 हजार 572 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 869 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा रुग्ण बाधित दर 11.71 टक्के असून 2.20 टक्के इतका मृत्यूदर आहे.