महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे झेंडूना मिळेना बाजार, बळीराजा झाला बेजार - मार्डी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीमुळे झेंडूच्या फुलांना काहीच मागणी नाही. आर्थिक नफा मिळावा या हेतूने पारंपारिक शेतीला फाटा देत काही तरुणांनी झेंडूच्या फुलांची शेती केली होती. पण, मागणीच नसल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्ती केली.

झेंडूची फुले
झेंडूची फुले

By

Published : Apr 1, 2020, 7:18 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यात नगदी पीक असलेले कापूस, सोयाबीन हे प्रमुख पीके असताना काही शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढावे या हेतूने मारेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी झेंडू फुलाच्या वृक्षांची लागवड केली. मात्र, कोरोनाच्या फटक्यामुळे या शेतऱ्यांवर फुलझाडे काढण्याची वेळ आली आहे. यातून लाखो रुपयांचा फटका बसत असल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

आपल्या व्यथा मांडताना शेतकरी

मारेगाव तालुका हा अदिवासी बहुल तालुका आहे. तालुक्यात एकही उद्योग कारखाने नसल्याने येथील नागरिकांचा शेती हा मुख व्यवसाय आहे. प्रमुख पिके असलेल्या कापूस, सोयाबीन व्यतिरिक्त आपल्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून मार्डी परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी झेंडू फुलांच्या झाडाची लागवड केली.

अनेकांच्या शेतातील फुलझाडे पाहता आनंदाची चाहूल लागली होती. पण, कोरोनाची नजर लागली. लाखो रुपयांची फुले टवटवीत असताना संचारबंदीने मार्केट बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. कोणताही व्यापारी या फुलांकडे फिरकत नसल्याने मार्डीसह, बोदाड, डोंगरगाव, चनोडा येथील अविनाश हरबडे, गजानन धोबे, नंदकिशोर खामनकर, प्रवीण लांबट, अमोल ढेंगळे, विशाल खामनकर, तेमदेव सातपुते, गोपाळ ढोके, सुरज पंडिले, गजानन चौधरी या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. यातील अनेक शेतकरी फुलझाडे नष्ट करण्याचा विचार करत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा -झरीमध्ये बिअर बारवर दरोडा, 33 हजाराचा दारूसाठा लंपास

ABOUT THE AUTHOR

...view details