महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ शहर अन् तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बंद

यवतमाळ जिल्ह्यात कारोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक यवतमाळ शहर व तालुक्यात असल्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येगडे यांनी यवतमाळ शहरातील व तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 10, 2021, 10:24 PM IST

Updated : Apr 10, 2021, 10:33 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात कारोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक यवतमाळ शहर व तालुक्यात असल्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येगडे यांनी यवतमाळ शहरातील व तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

यवतमाळ शहर अन् तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बंद

हा भाग केला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित

शहरातील प्रतिबंधित क्षेत्र खरद, शिवाजी नगर प्रभाग क्र.14, लोहारा येथे तीन ठिकाणी, जे.एन.पार्क, प्रभाग क्र.26 लोहारा, पोलिस मित्र कॉलोनी प्रभाग क्र.26, दत्तात्रय नगर प्रभा क्र.26 लोहारा, मीया नगरी, राधेनगरी प्रभाग क्र.26 लोहारा, जवाहर नगर प्रभाग क्र.14 लोहारा, जे.एन.पार्क प्रभाग क्र.13, वाघापूर ता. यवतमाळ तसेच देवी नगर, प्रभाग क्र. 26 येथे तीन ठिकाणे, मुंगसाजी नगर प्रभाग क्र.28, रेणूका नगर प्रभाग क्र.28, राजहंस सोसायटी प्रभाग क्र.28, रोहिणी सोसायटी प्रभाग क्र.28, महावीर नगर प्रभाग क्र.14, मौजा वरझरी येथे दोन ठिकाणी, मौजा सालोड, मौजा बोथबोडण या प्रस्तावित भागास प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे. या क्षेत्रात क्लस्टर कन्टेंटमेंट प्लॅन नुसार कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

पासेस धारकांना मुभा

शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेसाठी कर्तव्य करण्याची मुभा राहणार आहे. तसेच मुख्याधिकारी नगर परिषद, यवतमाळ व ग्राम स्तरावर सचिव यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना, पासेस निर्गमित करण्यात केल्या असून परवाना, पासेस धारकांची यादी संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकारी यांना देण्यात आली आहे. परवाना, पासेस धारकांना अत्यावश्यक सेवा पोलीस ठाणे अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेत पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतरचे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी नगर परिषद, यवतमाळ व ग्राम स्तरावर सचिव यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा -केंद्रीय पथकाची आर्णी, दिग्रस, पुसद येथील कोविड सेंटरला अचानक भेट

Last Updated : Apr 10, 2021, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details