यवतमाळ -जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात घट झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 288 जण पॉझिटिव्ह तर 443 जण कोरोनामुक्त झाले असून 13 जणांचा मृत्यू झाला. यातील 11 मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन मृत्यू खासगी रुग्णालयातील आहे.
3371 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह -
यवतमाळ जिल्ह्यात 288 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 443 कोरोनामुक्त - कोरोना रुग्णसंख्या यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात घट झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 288 जण पॉझिटिव्ह तर 443 जण कोरोनामुक्त झाले असून 13 जणांचा मृत्यू झाला.
शनिवारी एकूण 6894 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 288 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 6606 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3371 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1,714 तर गृह विलगीकरणात 1,657 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7,0387 झाली आहे. 24 तासात 443 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 65316 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1,700 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.24 व मृत्यूदर 2.42 आहे.
दिवसभरात 13 मृत्यू -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये नेर येथील 51 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 52 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 26 व 62 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 57, 70 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 65 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 61 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 82 वर्षीय महिला आणि वणी येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात पांढरकवडा येथील 60 वर्षीय पुरुष व घाटंजी येथील 43 वर्षीय पुरुष दगावले.
रुग्णालयात 1382 बेड उपलब्ध -
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि 34 खासगी कोविड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 897 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1382 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 271 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 306 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 148 रुग्णांसाठी उपयोगात, 378 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 478 उपयोगात तर 698 बेड शिल्लक आहेत.