यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात बुधवारी 14 जणांना दाखल करण्यात आले. यातील सहा जण हे दिल्लीवरून परत आलेले होते. तर, चार नागरिक अमेरिकेतून परत आले होते. यवतमाळ जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या शून्य आहे. मात्र, विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या जवळपास 100 आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
#CORONA : यवतमाळमधील 14 नागरिक जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल - यवतमाळ जिल्हाधिकारी एम. डी. सिंग
यवतमाळ जिल्ह्यातून बाहेर देशात गेलेले 31 नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. विदेशातून तसेच निजामुद्दीन (दिल्ली) येथील कार्यक्रमाला जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वत: समोर येऊन प्रशासनाशी संपर्क साधावा. जेणेकरून समुदायात संसर्ग होणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी केले आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
हेही वाचा...धक्कादायक : खासगी रुग्णालयाच्या एका चुकीमुळे ३ दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण
यवतमाळ जिल्ह्यातून बाहेर देशात गेलेले 31 नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. विदेशातून तसेच निजामुद्दीन (दिल्ली) येथील कार्यक्रमाला जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वत: समोर येऊन प्रशासनाशी संपर्क साधावा. जेणेकरून समुदायात संसर्ग होणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी केले आहे.
Last Updated : Apr 2, 2020, 10:38 AM IST