यवतमाळ- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन स्तरावरून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यात आता ग्रामीन भागातील महिलांनी देखील मदत पुरवण्यास सुरवात केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी बचत गटांच्या महिलांकडून मास्क, सॅनिटायझर, साबनची निर्मिती केली जात आहे.
यवतमाळात बचत गटातील महिलांकडून मास्क, सॅनिटायझरची निर्मिती - bachat gat yavatmal
सद्या बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील १० हजार बचत गटातील महिला या वस्तुंची निर्मिती करत आहेत. विशेष म्हणजे, निर्मिलेले सॅनिटायझर हे पूर्णपणे हर्बल आहे.
सद्या बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील १० हजार बचत गटातील महिला या वस्तुंची निर्मिती करत आहेत. विशेष म्हणजे, निर्मिलेले सॅनिटायझर हे पूर्णपणे हर्बल आहे. तसेच, बचत गटातर्फे १८५० गावामध्ये रंगोळीतून कोरोनाबाबत जनजागृती देखील केली जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे या मोहिमेतून सांगितले जात आहे.
हेही वाचा-कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक; आयसोलेशन वॉर्डातील 32 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह