महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; दोघांना अटक - महिलेची आत्महत्या

माहेरून पैसे मागवण्याच्या सासरच्यांच्या छळापायी विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. तर, सासरच्या मंडळींनी तिला मारल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

विवाहितेची पहिलीच दिवाळी ठरली अखेरची

By

Published : Nov 15, 2019, 7:10 PM IST

यवतमाळ -सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. काजल विशाल काटकर(रा. चांदोरेनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. सासरच्या मंडळीने तिला मारल्याचा आरोप मृत महिलेचा भाऊ जगदीश काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

विवाहितेची पहिलीच दिवाळी ठरली अखेरची

सदर माहितीप्रमाणे, काजलचा विवाह 11 जुलै 2019 ला रितीरिवाजानुसार झाला होता. सासरच्या लोकांनी सुरुवातीचे काही दिवस तिला चांगले वागविले. मात्र, नंतर माहेरून ५ लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ सुरू केला. याबाबत काजलने माहेरी सांगितले मात्र, सर्व सुरळीत होईल, असे म्हणत माहेरच्यांनी तिची समजूत काढली. त्यानंतर दिवाळी आटोपून सासरी आल्यानंतर काजलने आत्महत्या केल्याची माहिती माहेरी देण्यात आली. आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात धडक दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोघांना अटक केली आहे. लग्नाच्या पाच महिन्यानंतर विवाहितेला आत्महत्या करावी लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - यवतमाळमध्ये चोरीच्या साडेतीन लाखांच्या 8 दुचाकी जप्त; 5 आरोपी अटकेत

याप्रकरणी काजलचा पती विशाल, सासू प्रतिभा, सासरे ज्ञानेश्वर, नणंद प्रीती बुटले, शैलेश बुटले, शिल्पा शिरभाते, संदीप शिरभाते यांच्यावर तिचा छळ केल्याचा आरोप आहे. काजलच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी सांगितले.

हेही वाचा -यवतमाळ: महिला तहसीलदारांची रेती चोराट्यांवर धडक कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details