महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

14 पॉझिटिव्ह रुग्णांसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 233 जण भरती - corona virus

सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात एकूण 233 जण भरती असून यात 14 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.

corona
corona

By

Published : Apr 25, 2020, 10:48 AM IST

यवतमाळ - गुरुवारी नव्याने आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 14 झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या नागरिकांना प्रशासनाने इंदिरा नगर, भोसा रोड भागातून ताब्यात घेणे सुरू केले आहे. त्यांना आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे.

इंदिरा नगरात नागरिकांना उपचारासाठी ताब्यात घेण्यात घेताना

सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात एकूण 233 जण भरती असून यात 14 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.

मागील 24 तासात 101 जण नव्याने भरती असून शुक्रवारी एकूण 127 जणांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले आहे. तर शनिवारी जवळपास 150 लोकांचे नमुने पाठवण्यात येणार आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 134 जण तर गृह विलगीकरणात एकूण 795 जण आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठवलेल्या नमुन्यांची संख्या 862 आहे. यापैकी आतापर्यंत 711 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. पाठविलेले 127 रिपोर्ट अप्राप्त आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने समोर येऊन प्रशासनास माहिती द्यावी. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी आपल्या घरातच राहावे. शासन व प्रशासनाच्या दिलेल्या सुचनांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details