जलवाहिनाला तडा गेल्याने जीवन प्राधिकरण कार्यालयासमोरच अवतरली गंगा, लाखो लिटर पाण्याचा अपव्यय - yavatmal
गोधनी रोडवरील जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या समोर बीएसएनएल ४ जी (महानेट) अंडरग्राउंड वायरिंग करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना प्राधिकरणाच्या रोहित्राजवळ पाणीपुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीला तडा गेला. यामुळे रस्त्याच्या मधोमध जीवन प्राधिकरण विभागाची गंगा अवतरली आहे.
पाण्याचा अपव्यय झाल्यामुळे रोष व्यक्त करताना नागरिक
यवतमाळ- एकीकडे शहराला १० ते १२ दिवसांनी जीवन प्राधिकरण विभागाकडून पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या समोरच शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज सकाळी ११ वाजता फुटली. त्यामुळे रस्त्यावर गंगा अवतरल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. मात्र, या जलवाहिनीच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे नागरिकामधून संताप व्यक्त केला जात आहे.