यवतमाळ- पुसद शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे.
पुसदममध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेली जलवाहिनी; अनिश्चित काळासाठी पाणीपुरवठा खंडित - पाणीपुरवठा
जलशुद्धीकरण केंद्रावरून थेट जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनीजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे पाईपलाईन पाण्यात वाहून गेली. त्यामुळे अनिश्चित कालावधीसाठी पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
पुसद शहरालगतच असलेल्या पूस नदीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या नदीच्या काठावरच जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या जलशुद्धीकरण केंद्रावरून दोन किलोमीटरची पाईपलाईन टाकून 60 लाख लिटर क्षमतेच्या तीन पाण्याच्या टाकीत हे पाणी सोडण्यात येते. यातून पुसद शहरातील 35 हजार नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो.
जलशुद्धीकरण केंद्रावरून थेट जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनीजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे पाईपलाईन पाण्यात वाहून गेली. त्यामुळे अनिश्चित कालावधीसाठी पाणीपुरवठा खंडित झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिण्याचे पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी नागरिकांना केले आहे.