यवतमाळ -वणी तालुक्यातील चिखलगाव येथून अवैधरीत्या दारू वाहून नेण्याच्या तयारीत असलेल्या दोन वाहनांवर वणी पोलिसांनी कारवाई केली. त्यात दारूसह सहा लाख 83 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली.
अवैध दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त; वणी पोलिसांची कारवाई - Wani police
वणी तालुक्यातील चिखलगाव येथून अवैधरीत्या दारू वाहून नेण्याच्या तयारीत असलेल्या दोन वाहनांवर वणी पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, वाहनात संत्रा कंपनीचा देशी दारूच्या 25 पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी धनेश्वर भवानीशंकर जोशी ( 52, रा. मोर्यनगर, चिखलगाव) व कुंदन कोकाजी चव्हाण ( 27, रा. शारदा सॉ मिल मागे, शास्त्रीनगर, वणी) या दोघांना ताब्यात घेऊन देशी दारूच्या 25 पेट्या किंमत अंदाजे 65 हजार रुपये, रोख 18 हजार आणि दोन वाहन असा एकूण सहा लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा-'कायद्याबाबत माघार घेता येत नसेल तर सरकारमधून माघार घ्यावी'