महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lok Sabha Election : यवतमाळ-वाशिम मतदारसंघ; एका गावाचा बहिष्कार वगळता तापत्या उन्हात मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

उमेदवारांनी सकाळी ११ वाजेपर्यंत मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र, उन्हाचा तडाखा वाढला आणि मतदारांनी मतदार केंद्राकडे पाठ फिरवली. त्यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता होती. मात्र, उन्हाचा तडाखा कमी होताच मतदारांनी पुन्हा मतदानासाठी गर्दी केली. त्यामुळे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वाशिम-यवतमाळ मतदारसंघ : मतदाराचा हक्क बजावताना खासदार भावना गवळी

By

Published : Apr 11, 2019, 7:38 AM IST

Updated : Apr 11, 2019, 8:47 PM IST

यवतमाळ -यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात १७ व्या लोकसभेसाठी एका गावातील बहिष्कार वगळता सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २०१९ च्या या निवडणुकीत ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ४२.५ डिग्री सेल्सिअस तापमानातही नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पूर्ण

वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र, उन्हाचा तडाखा वाढला आणि मतदारांनी मतदार केंद्राकडे पाठ फिरवली. त्यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता होती. मात्र, उन्हाचा तडाखा कमी होताच मतदारांनी पुन्हा मतदानासाठी गर्दी केली. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता. मात्र, काही वेळातच बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यामुळे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत हाच टक्का ५९ टक्के होता. यंदाच्या निवडणुकीतही हा आकडा ६० टक्क्यांच्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात वाशिम जिल्ह्यात ६ लाख ३५ हजार ५४६ मतदार आहेत. जिल्ह्यात यापैकी महिला ३०३८५७, पुरुष ३३१६६८ मतदार आहेत. याच मतदारसंघातील नेर तालुक्यातील आजंती गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. या गावातील १ हजार ८९९ मतदारांपैकी फक्त ९३ मतदारांनी ३.३० वाजेपर्यंत मतदान केले होते.

पालकमंत्री मदन येरावार यांनी यवतमाळ शहरातील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. 'राज्यात आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांनी ५५ महिन्यांच्या कार्यकाळात उपेक्षित कष्टकरी शेतकरी व्यापारी यांच्या दारापर्यंत विकासाचा रथ पोहोचवला. म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवून या वर्षीसुद्धा केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता येईल,' अशी प्रतिक्रिया यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिली.

भाजप-शिवसेना युतीच्या उमेवादर खासदार भावना गवळी यांनी राजेंद्र प्रसाद विद्यामंदिर येथे मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण मतदारसंघात फिरल्यानंतर मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विजय निश्चित असल्याची खात्री आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच जनतेला मतदान करण्याचे आव्हानही त्यांनी केले होते.

काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केले. तसेच अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या आहेत. मात्र, त्यातही काँग्रेसचे पारडे जड असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे यांनीही राजुरी येथे मतदानाचा हक्क बजावला.

यंदाच्या निवडणुकीत तरुण-तरुणी आणि प्रथमच मतदान करणाऱ्यांचाही मतदानात सहभाग दिसून आला. या निवडणुकीत वृद्धांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. शालेय विद्यार्थिनींनी वृद्धांना व्हीलचेअरमध्ये बसवून मतदान केंद्रावर आणण्यास मदत केली.

भाजपचे बंडखोर उमेदवार पी.बी आडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप बाजोरिया, चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध हास्य कलाकार अंकुर वाढवे यांनीही आपल्या मुळगावी मतदानाचा हक्क बजावला.
मतदारसंघात तसेच, मतदान बूथवर चोख पोलीस बंदोबस्त पाळण्यात आला. प्रत्येक उमेदवार कार्यकर्ते बूथ लावून जिल्ह्यातील मतदारांना त्यांचे मतदानकेंद्र शोधण्यास मदत करीत होते. मतदारांची नावे अनुक्रमांक व मतदान केंद्राचा पत्ता ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे सुरळीतपणे मतदान पार पडले. मात्र, आता यवतमाळचा खासदार कोण होणार? हे २३ मे'लाच ठरणार आहे.

Last Updated : Apr 11, 2019, 8:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details