महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बुढा हो या जवान सभी करे मतदान', पुसद तालुक्यात मतदार जनजागृती - voting awareness rally by students

'बुढा हो या जवान सभी करे मतदान' असे म्हणत पुसद तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती पुसद यांच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते. या मतदार जनजागृती रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

'बुढा हो या जवान सभी करे मतदान', पुसद तालुक्यात मतदार जनजागृती

By

Published : Sep 30, 2019, 1:34 PM IST

यवतमाळ -'बुढा हो या जवान सभी करे मतदान' असे म्हणत पुसद तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती पुसद यांच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते. या मतदार जनजागृती रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. तसेच मतदार जनजागृती रॅलीमध्ये विविध उपक्रम राबविले.

'बुढा हो या जवान सभी करे मतदान', पुसद तालुक्यात मतदार जनजागृती

हेही वाचा -पुण्यात अतिवृष्टीमुळे अनेक संसार उघड्यावर, समाजसेवी संस्थांनी दिला मदतीचा हात

यामध्ये पुसद तालुक्यातील हुङी (बु) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गाने प्रभात फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी शृंखला बनवुन वोट नावाची आकृत्ती तयार करून मतदार जनजागृती केली. तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पुसद विधानसभा मतदारसंघ तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद शिवाजी गवई यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details