यवतमाळ- गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना आज पोलीस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. यात यवतमाळ जिल्ह्यामधील आर्णी तालुक्यातील तरोडा (मांगुळ) येथील जवान अग्रमन बक्षुजी रहाटे यांनाही वीरमरण आले. मानवंदनेनंतर त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेने यवतमाळला पाठवण्यात आले.
दोन चिमुकल्या मुलींसह पत्नी आणि भाऊ घेऊन निघाले 'वीर'जवानाचे पार्थिव - naxal attack
यात यवतमाळ जिल्ह्यामधील आर्णी तालुक्यातील तरोडा (मांगुळ) येथील जवान अग्रमन बक्षुजी रहाटे यांनाही वीरमरण आले. मानवंदनेनंतर त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेने यवतमाळला पाठवण्यात आले.
यावेळी त्यांचा लहान भाऊ आशिष रहाटे, पत्नी रेश्मा हे चार वर्षांची गार्गी आणि दीड वर्षांची आरुषी या दोन लहान मुलींसह जवानाचे पार्थिव गडचिरोली येथून चार वाजता घेऊन निघाले आहेत. रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील जन्मगावी तरोडा येथे पोहोचेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गडचिरोली येथे मानवंदना देताना पत्नी रेश्मा व भाऊ आशिष यांचे अश्रू अनावर झाले होते. मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या १५ जवानांना वीरमरण आले होते.