महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

त्रिवेणी संगमावरील 'जागजई'. . . आदिवासी समाजाची विदर्भातील पंढरी

आदिवासी बांधवांची पंढरी म्हणून जागजाई हे तिर्थस्थळ ओळखले जाते. बुद्धपोर्णिमेला जागजाई येथे लाखो आदिवासी बांधव पवित्र स्नानाला येतात.

जागजईला जमलेले आदिवासी बांधव

By

Published : May 20, 2019, 1:56 PM IST

यवतमाळ- राळेगाव तालुक्यातील जागजई येथे तीन नदीचा संगम असल्याने बुद्धपोर्णिमेला विदर्भातील आदिवासी बांधव हे आंघोळीसाठी येतात. पेरसापेन, भिमालपेन, रान, तोडोबा, कल्यासूर आदी देवतांच्या स्नानाचा वैशाख पौणिमा हा पवित्र दिवस आहे. त्यामुळे हजारो आदिवासी बांधव या ठिकाणी पवित्र स्नान करतात. त्यामुळेच आदिवासी समाजाची पंढरी म्हणून जागजई ओळखली जाते.

जागजईला जमलेले आदिवासी बांधव


यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने हजारो आदिवासी भाविक दरवर्षी या ठिकाणी हजेरी लावतात. वर्धा आणि यशोदा नदीच्या संगमावर हे क्षेत्र वसले आहे. या ठिकाणी संत झेबूजी महाराज यांचे देवस्थान आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहात आदिवासी समाज बांधव याठिकाणी येतात. रात्रीपासून लोक दुरून येतात.


भल्या पहाटे भाविक देवांच्या मूर्तीमागे वाजत-गाजत सहभागी होऊन स्नान करतात. या ठिकाणचे आदिवासी बांधव आपल्या गावातील देवांची पूजा करून या ठिकाणी वर्धा नदीच्या पंचधारा स्नानासाठी दाखल होतात. सुंदर चवर सजवलेले देव गावागावातून मिरवणुकीने येतात. आदिवासी बांधव त्यांचे खास पेहराव करून नृत्य करतात. यासाठी दोन-तीन दिवस आधीच ते आपल्या गावातून निघतात. वैशाख स्नान म्हणजे आदिवासी देवदेवतांचे अडीच दिवसांचे माहेर मांडले जाते. सोबत असलेल्या देवतांच्या भल्या पहाटे या संगमात स्नान घातले जाते.

या तीर्थक्षेत्राला आदिवासींची काशी असेही म्हटले जाते. पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत भाविक राम मंदिर, विठ्ठल मंदिर, निघूनशी महाराज मंदिरात दर्शन घेऊन स्नान करतात. त्यामध्ये महिला लहान मुले सुद्धा असतात. अनेक वर्षे झाली ही प्रथा जागजाई येथे सुरू आहे. परंतु त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आदिवासी समाजामधून नाराजीचा सूर निघत आहे. आदिवासी राखीव मतदार संघातील हे गाव असून आदिवासी समाजातील आमदार आहेत. परंतु त्यांनीही आदिवासी समाज बांधवांची पंढरी असलेल्या जागजाई येथे कोणत्याही प्रकारची सुविधा दिल्या नाहीत व कोणताही निधी दिला नसल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details