महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना संशयिताला जनरल वॉर्डात ठेवले; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा हलगर्जीपणा - yavatmal corona news

डॉक्टर, नर्स आणि इतर असे 40 कर्मचारी त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. त्यामुळे सर्वांना क्वारंनटाईन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना संशयिताला जनरल वॉर्डात ठेवले; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा हलगर्जीपणा
कोरोना संशयिताला जनरल वॉर्डात ठेवले; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा हलगर्जीपणा

By

Published : Apr 9, 2020, 8:43 PM IST

यवतमाळ- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा हलगर्जीपणा उघड झाला असून कोरोनाच्या संशयित रुग्णाला दोन दिवस 19 नंबरच्या एमआयसीयू जनरल पेशंटच्या वॉर्डात ठेवले होते. 8 एप्रिल रोजी सायंकाळी त्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. तातडीने हा वॉर्ड खाली करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

कोरोना संशयिताला जनरल वॉर्डात ठेवले; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा हलगर्जीपणा

डॉक्टर, नर्स आणि इतर असे 40 कर्मचारी त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. त्यामुळे सर्वांना क्वारंनटाईन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी सात जण दुसऱ्या राज्यातील असून एक जण यवतमाळ जिल्ह्यातील आहे.

कोरोनाच्या संशयित रुग्णाला 6 ते 8 एप्रिल हे दोन दिवस एमआयसीयू जनरल पेशंटच्या वॉर्डात ठेवले होते. कोरोनाच्या संशयित रुग्णाला दोन दिवस 19 नंबरच्या एमआयसीयू जनरल पेशंटच्या वॉर्डात ठेवले होते. त्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली. या वॉर्डात तीन शिफ्टमध्ये डॉक्टर, 10 नर्स, नातेवाईक असे चाळीस जणांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांना क्वारंनटाईन करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details