यवतमाळ - जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य सध्या पर्यटकांनी फुलले आहे. त्यांचे मुख्य आकर्षण आहे येथील व्याघ्र दर्शन. या अभयारण्यात वन्य प्राणी मोठ्या संख्येने आहेत. तसेच वाघाचे दर्शनही हमखास होत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे.
हेही वाचा - 'राज्य सरकारचे 'रिमोट सिल्वर ओक'वर, त्याची 'बॅटरी' दिल्लीत'
या अभयारण्यात जवळपास २२ वाघ असल्याचे सांगितले जाते. मागील ३ ते ४ वर्षांपासून व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हे अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित होण्याच्या दृष्टीने सध्या पावले उचलली जात आहेत.
हेही वाचा - VIDEO: वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांवर वाघाचा हल्ला