यवतमाळ- संस्थात्मक विलागीकरण कक्षामध्ये भरती असलेल्या महिलेचा रिपोर्ट नव्याने पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला पुसद तालुक्यातील हुडी येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहे.
यवतमाळमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 101 वर; एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - 101 कोरोना रुग्ण यवतमाळ
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 101 वर गेली आहे. मात्र, यापैकी 94 जण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
corona
या अहवालानंतर जिल्ह्यात अॅक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा 7 वर गेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला आता 16 रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 पॉझिटिव्ह आणि 15 नेगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 101 वर गेली असून यापैकी 94 जण बरे होऊन घरी गेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.