महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुकूटबन झरी परिसरात वाघाची दहशत; शेतात दिसले पावलांचे ठसे - farmer

झरी जामनी व मुकूटबन परिसरात वाघाच्या पावलांचे ठसे येथील आढळून आले आहेत. या घटनेची माहिती पांढरकावड वनविभागाला देण्यात आली आहे.

वाघाच्या पावलांचे ठसे

By

Published : Aug 4, 2019, 7:43 AM IST

यवतमाळ- झरी जामनी व मुकूटबन परिसरात वाघाची दहशत वाढली आहे. कारण वाघाच्या पावलांचे ठसे येथील शेतात आढळून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

आदिवासी बहुल झरी तालुक्यातील बहुतांश भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. जंगलात वाघ, हरीण, चितळ, चित्ता, लांडगे, कोल्हे, मोर, जंगली डुक्कर व इतर जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. तालुक्यात निमनी, पवनार, शिबला, तेजापूर, खडकडोह परिसर हा घनदाट जंगलाचा आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील पवनार, निमनी, कोसारा, मार्की, शिबला व गणेशपूर परिसरात वाघाने मोठा कहर केला. वरील गावांसह इतर अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ले करून जनावरांची शिकार झाली आहे. महिला व पुरुषांनासुद्धा वाघाच्या शिकारीचे बळी पडावे लागले. ज्यामुळे वाघाच्या दहशतीत शेतकऱ्यांसह गाकऱ्यांना राहावे लागत आहे. मुकूटबन गावाला लागून अर्धा किलोमीटर अंतरावर बंद असलेल्या कोळसा खाणीमागे वाघाचे ठसे आढळले आहेत. मुकूटबन येथील शेतकरी प्रकाश अडपावार, पुरषोत्तम जिनावार, देवा येनगंटीवार, बक्का निल्लेवार व भुमन्ना मंदुलवार हे शेतात गेले असता त्यांना शेतात वाघाचे ठसे आढळले. इतरही शेतात वाघाचे ठसे आढळले. त्यामुळे या परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याची शंका सदर शेतकऱ्यांना आली.

या परिसरात जाण्यास शेतकरी भीत आहेत. या भागात अमेरिकन बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडा-झुडपात तर वाघ वास्तव्य करीत नाही ना अशी शंका शेतकरी घेत आहे. या घटनेची माहिती पांढरकावड वनविभागाला देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details