महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Yavatmal Girl Missing : तीन वर्षीय चिमुकली चार दिवसापासून बेपत्ता, श्वान पथक बोलावले, एलसीबीच्या पथकाकडूनही शोध सुरु - आर्णी तालुका कुऱ्हा डुमनी गाव

यवतमाळ जिल्ह्यातल्या कुऱ्हा डुमनी ( Kurha Dumni Village In Yavatmal ) या गावातील अवघे तीन वर्षे वय असलेली चिमुरडी बेपत्ता ( Yavatmal Girl Missing ) झाली आहे. चार दिवसांपासून मुलगी सापडत नसल्याने अखेरीस श्वान पथकाला पाचारण ( Dog Squad Called ) करण्यात आले. यासह स्थानिक गुन्हे शाखा ( Local Crime Branch Yavatmal ) आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ( Detection Branch Yavatmal ) पथकही या चिमुरडीचा शोध घेत आहे.

तीन वर्षीय चिमुकली चार दिवसापासून बेपत्ता
तीन वर्षीय चिमुकली चार दिवसापासून बेपत्ता

By

Published : Dec 23, 2021, 3:55 PM IST

यवतमाळ : सोमवारला बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा ( Yavatmal Girl Missing ) रात्रंदिवस शोध घेऊनही कोणताही सुगावा हाती न लागल्याने आर्णी पोलिसांनी आज दुपारी 12 वाजता श्वानपथकाला पाचारण केले. आर्णी तालुक्यातील कुऱ्हा डुमनी ( Kurha Dumni Village In Yavatmal ) येथून सोमवारी दुपारी 2 ते 3 च्या सुमारास मानवी चोले ही चिमुकली बेपत्ता झाली आहे.

वडिलांनी दिली तक्रार

याबाबत वडिलांनी त्वरीत पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच ठाणेदार जाधव आपल्या ताफयासह कुऱ्हा जंगल परिसरात पोहचले. त्यांनी वनविभागाला बोलावुन सोबत घेत सर्व परिसर पिजूंन काढला. तेव्हापासून पोलीस मानविचा शोध घेतच आहे. या घटनेला आज चार दिवस झाले. ती अजून सापडली नसल्याने आर्णी पोलिसांनी आज अखेर दुपारी 12.30 वाजता क्याडी नावाच्या विशेष श्वानपथकाला पाचारण ( Dog Squad Called ) केले.

तीन वर्षीय चिमुकली चार दिवसापासून बेपत्ता, श्वान पथक बोलावले, एलसीबी आणि डीबी पथक दाखल

शेतशिवार, जंगल परिसर काढला पिंजून

कुऱ्हा डुमनी गावात, मंदिरात, शेतशिवार व जंगलं परिसर पिंजून काढला आहे. त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखा ( Local Crime Branch Yavatmal ) व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ( Detection Branch Yavatmal )पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, त्यांची टीम तसेच आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव, जमादार सतिष चौधार, अमित झेंडकर, मनोज चव्हाण, मिथुन जाधव, लेडीज पोलीस कॉन्स्टेबल मीनाक्षी सावळकर, प्रीती कोमटे असून तपास सुरू आहे. मानवी चोले या चिमुकलीचे कोणतेही धागेदोरे अजून पोलिसांच्या हाती लागले नसल्याचे कळते.

ABOUT THE AUTHOR

...view details