महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, दोघांना डिस्चार्ज - यवतमाळ कोरोना आकडेवारी बातमी

सोमवारी कोरोनामुळे आणखी तीन रुग्णांचा बळी गेला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुसद येथील 60 वर्षीय आणि दारव्हा येथील 45 वर्षीय पुरुष तर, दारव्हा येथील 66 वर्षीय महिलेचा समावेश आहे. मृत्यु झालेल्या तिघांनाही सारीची लक्षणेसुध्दा होती. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 184 वर गेली असून यापैकी 146 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु
जिल्ह्यात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु

By

Published : Jun 15, 2020, 8:32 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक आहे. यातच, सोमवारी तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यूचा आकडा सहा झाला आहे. तर, आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले दोन जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सोमवारी कोरोनामुळे आणखी तीन रुग्णांचा बळी गेला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुसद येथील 60 वर्षीय आणि दारव्हा येथील 45 वर्षीय पुरुष तर, दारव्हा येथील 66 वर्षीय महिलेचा समावेश आहे. मृत्यु झालेल्या तिघांनाही सारीची लक्षणेसुध्दा होती. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत 32 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण 39 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 184 वर गेली असून यापैकी 146 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रेड झोनमधून आलेल्या नागरिकांनी स्थानिकांच्या संपर्कात येऊ नये. तसेच स्थानिक लोकांनीसुध्दा आपल्या गावात आलेल्या लोकांबद्दल तत्काळ तालुकास्तरीय समितीला कळवावे. नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडून गर्दी करू नये. या विषाणुच्या संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडलो तर मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details