यवतमाळ -जुन्या वादातून तीघा भावांनी मिळून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना पुसद येथील बसस्थानक परिसरात घडली. शेख आसिफ शेख हनीफ (रा. पार्वती नगर) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जुन्या वादातून तीघा भावांनी मिळून केली एकाची हत्या; पुसद बसस्थानक परिसरातील घटना - हत्या
जुन्या वादातून तीघा भावांनी मिळून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना पुसद येथील बसस्थानक परिसरात घडली
हत्या
मृत शेख आसिफ यांचा शेख अल्ताफ शेख सलाम यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री पुसद येथील बसस्थानक परिसरात आसिफला आरोपी शेख अल्ताफ व त्याचे दोन भाऊ शेख सादिक व शेख इमरान यांनी गाठले. त्यांनी आसिफला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी अल्ताफने चाकू पोटात भोसकून आसिफची हत्या केली. सदर तीनही आरोपींना पुसद शहर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणेदार प्रथमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.