यवतमाळ: मार्च महिन्यापासून प्रशासन कोरोना विरोधात लढा देत आहे. आजचा दिवस प्रशासन आणि नागरिकांना दिलासा देणारा ठरला. पॉझिटिव्ह रुग्ण केवळ 22 आढळले आणि मृत्यू एकही नसल्याने काहीसा दिलासा मिळाला. चार महिन्यानंतर आज प्रथमच कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही.
दिलासादायक! यवतमाळ जिल्ह्यात चार महिन्यानंतर कोरोनाने एकही मृत्यू नाही - corona case in yavatmal
यवतमाळ जिल्ह्यात मार्च महिन्यापासून प्रशासन कोरोना विरोधात लढा देत आहे. आजचा दिवस प्रशासन आणि नागरिकांना दिलासा देणारा ठरला. पॉझिटिव्ह रुग्ण केवळ 22 आढळले असून मृत्यू एकही नसल्याने काहीसा दिलासा मिळाला.
कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात रुग्ण वाढीसह मृत्यू होण्याच्या संख्येने उच्चांक गाठला होता. आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ही आठ हजार 748 झाली असून 272 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आज पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या कमी झाली आहे. दिवसभरात एकही कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. ही समाधानकारक बाब मानली जात आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 22 जणांमध्ये सोळा पुरुष व सहा महिलांचा समावेश आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात असोसिएशन वाॅर्मडध्ये 244 जण उपचार घेत आहेत.