महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अग्रमान रहाटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - funeral

अग्रमान रहाटे अमर रहे अशा जयघोषात करत श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बंदुकीच्या फैरी झाडून पोलिसांनी मानवंदना देण्यात येणार आहेत.

अग्रमाह रहाटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By

Published : May 3, 2019, 9:33 AM IST

यवतमाळ - कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवानांना वीरमरण आले. एका चालकालाही आपला प्राण गमवावा लागला होता. या हल्ल्यात यवतमाळतील आर्णि तालुक्यातील तरोडा गावातील अग्रमान रहाटे या जवानाला वीरमरण आले होते. रहाटे यांच्यावर गुरूवारी रात्री उशिरा त्यांच्या मूळ गावी तरोडा येथे त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अग्रमाह रहाटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रहाटे यांचे पार्थिव त्यांचे जन्मगाव तरोडा येथे सकाळी आठ वाजता आणण्यात आले. यावेळी त्यांचा लहान भाऊ आशिष पत्नी रेश्मा दोन लहान मुली यावेळी सोबत होते. सकाळी आठ वाजता तरोडा आणि मांगुळ या गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आले. यावेळी भारत माता की जय या घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. अग्रमान रहाटे अमर रहे अशा जयघोषात करत श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बंदुकीच्या फैरी झाडून पोलिसांनी मानवंदना देण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details