यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोशन भीमराव ढोकणे या तरुणाचा मृतदेह बेपत्ता झाला होता. त्यामुळे ढोकणे कुटुंबीयांनी प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले. मात्र चौकशीची वस्तुस्थिती कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी उपोषण मागे घेतले आहे. तर चौकशी समितीचा अंतिम अहवाल मंगळवारपर्यंत येणार असून संबंधित दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून मृतकाच्या कुटुंबाला आश्वासन देण्यात आले.
जीएमसी मृतदेह बेपत्ता प्रकरण; ढोकणे कुटुंबीयांनी उपोषण घेतले मागे - gmc yavatmal
बेपत्ता मृतदेहाच्या चौकशी प्रकरणी ढोकणे कुटुंबीयांनी उपोषण सुरु केले. मात्र चौकशीची वस्तुस्थिती कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी उपोषण मागे घेतले आहे. तर चौकशी समितीचा अंतिम अहवाल मंगळवारपर्यंत येणार असून संबंधित दोषीवंर योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून मृतकाच्या कुटुंबाला आश्वासन देण्यात आले.
रोशन भीमराव ढोकणे (वय 27) याच्या मृतदेहावर मारोती दासू जाधव या नावाने डेथ लेबल लावण्यात आले होते. तर मारोती जाधव यांचा मुलगा विनोद जाधव याची मनस्थिती बरी नसल्याने त्यांनी मृतदेहाची ओळख पटविण्याच्यावेळी दुर्लक्ष केले. त्यामुळे यवतमाळ नगर परिषदेमार्फत मोक्षधाम येथे मारोती जाधव यांच्या जागी रोशन ढोकणे यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला. मारोती जाधव कोरोना पॉझिटिव्ह होते. तसेच शवविच्छेदनगृहात आणखी एक पुरुष मृतदेह होता. मारोती जाधव यांच्या नातेवाईकांनी रोशनच्या मृतदेहाची ओळख मारोती जाधव म्हणून केली. ही संपूर्ण वस्तुस्थिती रोशन ढोकणे यांच्या कुटुंबीयांना समजावून सांगण्यात आली. तसेच त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता त्यांनी ती मान्य केली आणि उपोषणाची सांगता झाली. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल मंगळवापर्यंत सादर होण्याची शक्यता असून संबंधित दोषीवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.