वाशिम - जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांना पोलिसांनी अटक केली आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची कोणतीही पूर्व सूचना न देता वीजतोडणी केल्यामुळे इंगोले यांनी वीजवितरण विभागाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारपर्यंत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडले नाही तर वीज वितरण कार्यालची वीज तोडण्याचे अलटीमेटमही त्यांनी दिले होते. त्याचप्रमाणे इंगोले वीज वितरण कार्यालयाची वीज कनेक्शन तोडण्यासाठी जात असताना वाशिम पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यावेळी दामू अण्णा सोबत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
वाशिम; स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांना अटक
वीजबिल भरल्यामुळे नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची वीजजोडणी वीज वितरण कार्यालयाकडून कापण्यात अली आहे. त्यामुळे रब्बी पिकाचे तसेच भाजीपाला आणि फळबागेचे मोठे नुकसान होत आहे.
रब्बी पिकांचे नुकसान
वीजबिल भरल्यामुळे नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची वीजजोडणी वीज वितरण कार्यालयाकडून कापण्यात अली आहे. त्यामुळे रब्बी पिकाचे तसेच भाजीपाला आणि फळबागेचे मोठे नुकसान होत आहे. सद्या कोरोना काळात शेतकऱ्यांनी वीजबिल भरावे तरी कसे असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांनी उपस्थित केला होता. तसेच सोमवारपर्यंत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडले नाही तर वीज वितरण कार्यालची वीज तोडण्याचे अलटीमेटमही त्यांनी दिले होते.
हेही वाचा-मुंबई- रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही कोविड सेंटरमधील 60 टक्के खाटा रिकाम्या