महाराष्ट्र

maharashtra

वाघिनीचा संशयास्पद मृत्यू; वणी तालुक्यातील घटना

By

Published : Mar 23, 2021, 6:23 PM IST

वणी तालुक्यातील घोन्सा शेत शिवारामध्ये एका चार वर्षीय वाघिनीचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला आहे.

Suspicious death of tiger in Wani taluka
वाघिनीचा संशयास्पद मृत्यू; वणी तालुक्यातील घटना

यवतमाळ - वणी तालुक्यातील घोन्सा शेत शिवारामध्ये एका चार वर्षीय वाघिनीचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला आहे. गळ्यात तारांचा फास अडकून या वाघिणीचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या वाघिणीचे वय चार वर्षे असल्याचा अंदाज वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक प्रकाश दुमारे यांनी सांगितले.

वाघिनीचा संशयास्पद मृत्यू; वणी तालुक्यातील घटना
उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट-
बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस घोन्सा ते सोनेगाव पांदण रस्त्यावर असलेल्या एका नाल्यात ही वाघीण मृतावस्थेत पडून असल्याचे आढळले. यानंतर या घटनेची माहिती घोन्सा परिसरात समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. यासंदर्भात वनविभागालाही माहिती देण्यात आली. त्यानंतर मरेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, वनी चे वनपरिक्षेत्राधिकारी ताजने आणि मुकुटबनचे वनपरिक्षेत्राधिकारी वारे यासह वनविभागाचे पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.

या परिसरात मोठ्या प्रमाणात वाघांचा संचार असून शेतकरी दहशतीत असतात. त्यामुळं वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. वाघिणीला घोंसा येथून पांढरकवडा येथील आणून तीन पशुवैद्यकीय अधिऱ्यारी शवविच्छेदन करण्यात येणार आहेत त्यानंतरच तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असूून त्यादृष्टीने पुढील तपास करण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक प्रकाश दुमारे यांनी सांगितले.

हेही वाचा-'अपनेही जाल में फ---स', राष्ट्रवादीचा फडणवीसांवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details