यवतमाळ - महागावच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृत विद्यार्थीनी कलगाव येथील रहिवासी असून इयत्ता 7 वीच्या वर्गात शिकत होती. या विद्यार्थिनीचा खेळताना पडून मृत्यू झाल्याची माहिती वसतीगृह प्रशासनाने सांगितले मात्र, नातेवाईकांनी मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे.
मृत विद्यार्थिनी ही महागाव येथील समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जातीच्या मुलींसाठी असलेल्या निवासी शाळेच राहत होती. आज सकाळी एका मुलीचा खेळताना पडून मृत्यू झाल्याची माहिती वसतीगृह अधीक्षक मंगला भोयर यांना मिळाली. त्यांनी मुलीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.