यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार व इतरांवर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर ४ यांच्या न्यायालयाने १४ मे रोजी गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याच आदेश दिले होते. या आदेशास आज शुक्रवार १७ मे रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे.
पालकमंत्री मदन येरावार यांच्या चौकशीच्या आदेशास स्थगिती - court
न्यायालयाने आयुषी किरण देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १४ मे रोजी गुन्हे दाखल करून ३० दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर ४ यांच्या न्यायालयाने आयुषी किरण देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १४ मे रोजी गुन्हे दाखल करून ३० दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुध्द प्रतिवादी यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात रिव्हीजन पीटीशन दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. त्यात या प्रकरणी प्रतिवादी यांनी म्हणने सादर करेपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. यावेळी प्रतिवादी यांच्यावतीने अॅड. जगदिश वाधवाणी व अॅड. अशोक गुप्ता यांनी बाजू मांडली.