यवतमाळ - जून-जुलै महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. मात्र, काही खासगी शाळेत ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन आणि इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शाळा सुरू झाल्यानंतरही शिक्षणापासून वंचित राहत असलेले दिसत आहे.
सध्या खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे. आई वडिलांना मदत व्हावी, यासाठी विद्यार्थी शेतात राबत आहेत. पोट भरावे की, ऑनलाइन शिक्षण घ्यावे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
पर्याप्त सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित हेही वाचा...मेळघाट व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला.. एकाच दिवसात करावे लागणार पर्यटन
कोरोना विषाणूच्या संकटाने सर्व जीवनच बदलवून टाकले आहे. कालपर्यंत सर्व काही व्यवस्थित असताना आता चित्र पार बदलून गेले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने हाताला काम नाही. ही परिस्थिती घरोघरी आहे. त्यातच ऑनलाईन शाळा सुरू सुरू झाल्या. मात्र, अभ्यास कुठे आणि कसा करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे.
खरीप हंगामात शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दोन महिने घरी बसून असल्यावर हाताला काम मिळाले आहे. शेतीच्या कामावर आईवडील नाहीतर मुलेही जात आहेत. आपल्या कुटुंबाला हातभार लावावा हा एकमेव उद्देश त्यांचा आहे. शासनाने नेहमीप्रमाणे शाळा सुरू केल्यास शिक्षण घेऊ शकतो. मात्र, ऑनलाईन शिक्षण म्हटल्यावर या मुलांची असाहय्यता दिसून येत आहे. अद्याप अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल फोन नाही. त्यांनी शिक्षण कसे घ्यावे. पोट भरण्यासाठी काम करायचे की, मोबाईल घ्यायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर मायबाप सरकारने उपाय शोधावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
हेही वाचा...मालकाचा जीव वाचविण्यासाठी 'झिबली'ची नागाशी झुंज; सापाला मारुनच सोडले प्राण
ग्रामीण भागातील विद्यार्थी मागील आठ दिवसापासून शेतात काम करत आहे. घरी टीव्ही, मोबाईल काहीच नाही. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी सरकारने पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास दिलासा मिळेल. या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांच्याशी संपर्क साधला. आमच्याकडे अजून अधिकृत आदेश आले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.