महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारव्हा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा, अनेक संसार उघड्यावर - hailstorm

जिल्ह्यातील दारव्हा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला असून यात अनेक गावांचे नुकसान झाले आहे. लाखखिंडसह खेड, नायगाव, उमरी आदी गावांत वादळाने थैमान घातले.

वादळामुळे झालेले नुकसान

By

Published : Jun 8, 2019, 6:53 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यातील दारव्हा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला असून यात अनेक गावांचे नुकसान झाले आहे. लाखखिंडसह खेड, नायगाव, उमरी आदी गावांत वादळाने थैमान घातले. यात दगड व भिंत अंगावर कोसळल्याने ४ जण जखमी झाले आहेत. विजेच्या कडकडाटासह वादळाने लाखखिंड गावाला जबर तडाखा दिल्यामुळे निम्मे गाव उद्धवस्त झाले आहे.

वादळामुळे झालेले नुकसान

वादळामुळे विद्युत खांब तुटल्याने गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ही गावे अंधारात असल्याने गावकऱयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. खेड, नायगाव, उमरीसह लाखखिंड गावाला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. एकाच आठवड्यात लाखखिंडला दुसऱयांदा वादळाचा जोरदार तडाखा बसला. क्षणार्धात या गावात होत्याचे नव्हते झाले. कुडाची घरे उडून गेली तर विटामातीच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत.

गावातील पन्नास पेक्षा जास्त घरांवरील छत कोसळले आहेत. घरावरील छतच उडून गेल्याने घरातील अन्नधान्य, कपडे व इतर साहित्य उघड्यावर पडले आहे. घरे उद्धवस्त झाल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. वादळाचा फटका गावातील शाळांनाही बसला आहे. या नुकसानीमुळे नागरिकांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. तातडीने अहवाल सादर करून मदतीसाठी प्रस्ताव तयार केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details