यवतमाळ -महागाव तालुक्यातील तिवरंग ते भोसा मार्गावरील भोसा गावाजवळ बैलाने भरलेले ४ ट्रक गोरक्षक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडले. यातील 3 ट्रक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, १ ट्रक कार्यकर्त्यांनी अडवून ठेवल्याने ताब्यात घेण्यात आला. यावेळी चालकाने गोरक्षकांच्या अंगावर ट्रक घालन्याचा प्रयत्न केला. ट्रक आडवलेल्या कार्यकर्त्यांवर चालकाने चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात एक गोरक्षक किरकोळ जखमी झाला.
गोवंश तस्करी करताना चार ट्रक पकडले; तीन ट्रॅक घटनास्थळावरून पसार
कळंब येथून गाय बैल भरून ट्रक वसमतला नेण्यात येत होता. गोवंश तस्करांकडून कळंब, आर्णी, वसमत, नांदेड, टेकडी पोलिसांना या भागातून ट्रक नेण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ता देण्यात येत असल्याची कबुली एका ट्रक चालकाने दिली.
कळंब येथून गाय बैल भरून ट्रक वसमतला नेण्यात येत होता. गोवंश तस्करांकडून कळंब, आर्णी, वसमत, नांदेड, टेकडी पोलिसांना या भागातून ट्रक नेण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ता देण्यात येत असल्याची कबुली एका ट्रक चालकाने दिली. गोवंश तस्करीने भरलेले ट्रक यवतमाळ जिल्ह्यातून जात असताना पोलिसांना हप्ता दिला जात असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची तक्रार पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे गोरक्षक व शिवसेना पदाधिकारी करणार आहे. मागच्या काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारे तस्करीच्या ट्रक चालकांने पोलीस शिपायाला चिरडून टाकल्याची घटना घडली होती. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवंशाचे तस्करी होत असल्याने या प्रकाराला आळा घालावा, अशी भूमिका गोरक्षक समितीने घेतली आहे.