यवतमाळ - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने १९ फेब्रुवारीला भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दारव्हा रोडवरील कोल्हे सभागृहापासून या रॅलीला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुरूवात होणार आहे. यासाठी अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
शिवजन्मोत्सव : यवतमाळ शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन - organized
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने १९ फेब्रुवारीला भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
अशी निघणार रॅली -
या रॅलीची सुरूवात कोल्हे सभागृहापासून होणार आहे. ही रॅली नंतर लोहारा चौक-दर्डा नाका-साईश्रद्धा हॉस्पिटल रोड-आर्णी नाका-दाते कॉलेज चौक-वीर वामनराव चौक-माईंदे चौक-अँग्लो हिंदी शाळा चौक-तहसील चौक-मेन लाईन सराफ रोड-जयहिंद चौक-हनुमान आखाडा चौक-नगर परिषद चौक-तिरंगा चौक-सिव्हिल लाईन-स्टेट बँक चौक-पोस्ट ऑफिस चौक-एल आय सी चौक-मार्गे शिवतीर्थ या ठिकाणी रॅलीचा समारोप होईल.
या दुचाकी रॅलीत शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, अशी विंनती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे स्वागतअध्यक्ष बीपीन चौधरी, आयोजन समितीचे संयोजक डॉ. दिलीप महाले यांनी केली आहे. तसेच शिवजन्मोत्सवाच्य निमित्ताने मंडळाकडून विविध स्पर्धा, व्याख्याने, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.