यवतमाळ -यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी पाचव्यांदा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सलग पाचव्यांदा भावना गवळी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. आज भावना यांचा वाढदिवस आहे. व जनतेने आणि कार्यकर्त्यांनी विजयाच्या स्वरूपात वाढदिवसाचे गिफ्ट दिले असल्याची प्रतिक्रिया भावना गवळी यांनी व्यक्त केली आहे. शिवाय ही मोठी संघर्षमय निवडणूक होती आणि संघर्षाशिवाय विजय नसतो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
यवतमाळ-वाशिम : शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी गड राखला
सकाळी आठ पासून मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हापासूनच विद्यमान खासदार भावना गवळी या पहिला फेरी पासूनच आघाडीवर होत्या. साडेपाच वाजेपर्यंत त्यांनी 60 हजाराचे मताधिक्य घेतले होते. विजयाकडे वाटचाल होत असताना घरी आमदार निलय नाईक यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या आणि विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.
सकाळी आठ पासून मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हापासूनच विद्यमान खासदार भावना गवळी या पहिला फेरी पासूनच आघाडीवर होत्या. साडेपाच वाजेपर्यंत त्यांनी 60 हजाराचे मताधिक्य घेतले होते. विजयाकडे वाटचाल होत असताना घरी आमदार निलय नाईक यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या आणि विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना रात्री उशिरा विजयी निर्वाचन प्रमाणपत्र देणार असले तरी, त्या आत्ताच मोठ्या मताधिक्क्याने आघाडीवर असल्याने विजयी झाल्या आहेत.